उरण तालुक्यातील पूर्व विभाग व मुंबई गोवा,अलिबाग या महत्वाच्या मार्गाना जोडणाऱ्या खोपटा येथील दोन्ही खाडी पुलावर खड्डे पडल्याने या खड्ड्यामुळे पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुलावरील खड्डे भरण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा- एलिफंटा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; करोना काळानंतर स्थानिकांचेही व्यवसाय पुन्हा सुरू

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही भागांना जोडणारे दोन खोपटा खाडीपूल आहेत. यातील नवघर ते खोपटा दिशेच्या पुलावर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे खोपटा ते नवघर या मार्गावरील पुलालाही खड्डे पडलेले आहेत. या पुलावरील डांबराचे थर उखडले आहेत. त्यामुळे ही खड्डे पडले आहेत. या पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे एस.टी. बसेस आणि नवीमुंबई महानगरपालिकेच्या एन.एम.एम.टी. बसेसही प्रवासी वाहतूक करीत आहेत. या खड्ड्याचा त्रास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सहन करावे लागत आहे. यातील एक पूल हा स्प्रिंगच्या सहाय्याने जोडले आहे. त्यामुळे खड्ड्यामुळे पुलावर बसणाऱ्या धक्क्याचा परिणाम या स्प्रिंग वरही पडत आहे. त्यामुळे पुलावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उरणच्या दोन विभागांना जोडणाऱ्या या पुलावरील खड्डे भरण्याची मागणी केली जात आहे.