ठाणे- बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील एमआयडीसी अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. २४० कोटींचा निधी मंजूर झाला असून पावसाळ्यापूर्वी लवकरच रस्त्याचे रुपडे पालटेल हे आश्वासन पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. आज मितीस ए भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांचे अस्तिव हरवले आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत पारदर्शक व नियोजबद्ध काम करणार ,सुंदर शहराला अधिक गतिमान करणार ; राजेश नार्वेकर

नवी मुंबई लगत असलेली ठाणे- बेलापूर आद्योगिक नागरी आशियातील सर्वात मोठी आद्योगिक नागरी समजली जाते. मात्र, या ठिकाणी कासवगतीने पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. यात रबाळे महापेमध्ये असलेला ए भागातील २१ किलोमीटर रस्त्यांचे काम हे एमआयडीसी विभाग करणार होता. त्यासाठी २४० कोटींचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया पार पडताच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल व पावसाळयापूर्वी अद्यावत रस्ते तयार होतील असे आश्वासन तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते. दरम्यान स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि कामाला खिळ बसली, अशी माहिती वेदांत समर या उद्योजकाने दिली. “ए” भाग हा बहुतांश महापे व काही रबाळे नोडमध्ये येतो. एमआयडीसीमध्ये सर्वात खराब रस्ते याच भागात आहेत. भूखंड क्रमांक २०० च्या ओळीत पुढील सर्व गल्ल्यातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे. या ठिकाणी रस्ता होता का ? असा प्रश्न पडतो. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आजही इथल्या रस्त्यातून ओढ्याप्रमाणे वाहत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम

माझ्याकडे एक छोटी कार असून तिनेच मी कंपनीत ये-जा करतो मात्र सध्या रस्त्यांची अशी परिस्थिती आहे कि, छोटी कार नेणेही शक्य नाही. ट्रक डम्पर वा जमिनीपासून उंच गाड्यांच रस्त्यावरून तेही चालक चांगला असेल तर जाऊ शकतात. अशी माहिती श्रीनिवास पंडित या कर्मचार्याने दिली.
जागोजागी खड्डे, कुठेही दिशादर्शक फलक नाही, पथदिवे नाहीत, शिवाय मलनिस्सारण वाहिन्या, पाण्याचा निचरा होणारी गटार या पैकी एकही सुविधा नाही शिवाय ए गल्लीत येण्यास कोणीही  रिक्षा चालक तयार होत नाही एखादा आलाच तर दुप्पट तिप्पट पैसे आकारले जातात. अशी व्यथा येथील रस्त्यांची झालेली आहे. आमचे हॉटेलचे सामान आणण्यासही त्रास होती  पावसाळ्यात दोन वेळा मालवाहू मिनी डोंअरचे पाटे तुटले, अशी माहिती येथील हॉटेल चालक संतोष कदम यांनी दिली.

याबाबत समंधीत प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवर अनेकदा प्रयत्न केले. मोबाईलवर लघुसंदेश पाठवले मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.