राज्य महामार्ग असणाऱ्या उरण – पनवेल रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी कायम असून या मार्गावरील वाहन चालकांना खडखडताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खड्डयांमुळे होणारा त्रास कधी संपणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
उरण पनवेल या राज्य महामार्गावरील बोकडविरा ते नवघर फाटा हा चार किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डयांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. लोकसत्ता ने वारंवार खड्ड्याचे वृत्त दिल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली खडी उखडू लागली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खडखडाट कधी बंद होणार याची प्रतीक्षा वाहनचालकाना लागली आहे