चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला ऐरोलीतील सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाने शहरात शोभायात्रा आयोजित केली आहे. यात सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्टर-२ येथील सिद्धिगणेश मंदिर संस्कार भारती, ज्ञानदीप ग्राहक संघ आणि नादगर्जा ढोलताशा पथक शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. उमेद प्रतिष्ठान कोपरखरणे यांच्या वतीने शोभायात्रेत स्वच्छतेतून समृद्धीकडे हा संदेश देण्यात येणार आहे. तर अखिल सानपाडा रहिवासी संघाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या रथयात्रेत महिला सहभागी होणार आहेत. यात भजन, ढोलपथके सहभागी होतील. यंदा लेझीमचा ठेका स्वागतयात्रेतील विशेष आकर्षण ठरणार आहे. जुई गावातील गावदेवी मरीआई मंदिरापासून शिवाजी चौकापर्यंत ही स्वागतयात्रा निघणार असून विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.