नवी मुंबई : एपीएमसी बाजारात लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटत असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांत उपलब्ध होता, आता ११० ते १५० रुपयांवर दर पोहोचला आहे. त्यामुळे महिलांची लसूण फोडणी चांगलीच महागली आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात. मात्र यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी आहे, त्यामुळे लसूण महागला आहे. एपीएमसी कांदा बटाटा बाजारात गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, इंदोर येथून लसणाची आवक होत असते. मात्र यंदा लागवडीलखालील क्षेत्र कमी असून त्यात अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात लसणाची कमी आवक होत आहे.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण

हेही वाचा – नवी मुंबई : विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका, दोन दिवसांत ६० जणांवर आरटीओची कारवाई

जानेवारी-फेब्रुवारी मध्ये २०-२५ गाड्या आवक होती, एप्रिलपासून आवक कमी होत आहे. बुधवारी बाजारात अवघ्या ९ गाड्या दाखल झाल्या असून ९४७ क्विंटल आवक झाली आहे. घाऊक बाजारात मागील आठवड्यात ९० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध असरणाऱ्या लसणाच्या दरात २०-३० रुपयांनी दरवाढ झाली असून, आता ११० ते १५० रुपयांवर दर वधारले आहे. सुरुवातीला दर आवाक्यात होते, त्यामुळे गृहिणींनी समाधान व्यक्त केले. मात्र पुन्हा दर वाढल्याने गृहिणीकरिता लसूण फोडणी महागली आहे. सन २०१७ मध्ये लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रतिकिलो लसणाचे दर २०० ते २५० रुपयांवर गेले होते. यंदाही पुढील कालावधीत लसूण २०० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कांद्याच्या दरात वाढ

एपीएमसी बाजारात लसणाच्या पाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने कांदा भिजल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले असल्याने बाजारात उत्तम दर्जाचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत आहे, तर हलक्या प्रतीचा कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची दरवाढ होत आहे. बुधवारी बाजारात १३१ गाड्यांमधून १५ हजार ५६ क्विंटल आवक झाली असून, प्रतिकिलो कांदे आता ७ ते १५ रुपये दराने मिळत आहे. तेच आधी ५ ते ११ रुपयांवर उपलब्ध होते.

हेही वाचा – नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी पती-पत्नीला अटक

यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. तसेच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लसणाची आवक कमी आहे. लसणाच्या दरात वाढ होत असून पुढील कालावधीत लसणाचे दर आणखी वधाराण्याची शक्यता आहे. – महेश राऊत, व्यापारी, कांदा बटाटा बाजार