वाशीतील एपीएमसी बाजारात गणेशोत्सवानतंर कांद्याच्या किंमतीत वाढ झाली होती . परंतु पुन्हा नोव्हेंबर मध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली , मात्र पून्हा आज बाजारात कांद्याच्या दारात वाढ झालेली आहे. आवक कमी होत असून कांदा कांदा निर्यातदारांकडून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आलेली आहे . त्यामुळे उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी असल्याने कांद्याच्या दरात पुन्हा चार रुपयांची वाढ झालेली आहे . आधी प्रतिकिलो १५-१८ रुपये उपलब्ध असलेल्या कांदा आता १९ ते २२ रुपयांवर उपलब्ध आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील “स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला” लवकरच “बांगर” बुस्टर

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
navi mumbai municipal corporation, appeals residents
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

अवकाळी पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होत. मात्र पावसामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनावर लांबणीवर गेले . नवीन कांद्याच्या हंगामाला उशिरा सुरुवात होऊन आवक घटली होती. तसेच जुना साठवणूकीचा कांदा ही भिजल्याने खराब होत होता. त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी असल्याने दरवाढ होत होती. परंतु नोव्हेंबर महिन्यात नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली तसेच जुना कांद्याचेही आवक वाढली होती, त्यामुळे बाजारात दररोज १०० ते १२० गाड्या दाखल होत होत्या. परंतु बाजारात आता नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. गुरुवारी एपीएमसीत ७० गाडी आवक झाली असून, त्यामध्ये ४० गाडी जुना कांदा तर ३० गाडी नवीन कांदा दाखल झाला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील “स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला” लवकरच “बांगर” बुस्टर

नवीन कांदा आता चांगला येत असल्याने कांदा निर्यातदारांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करण्याला सुरुवात झाली आहे . तसेच उच्चतम प्रतीचा कांदाही कमी प्रमाणात येत आहे . त्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात प्रति किलो १५ ते १६ रुपयांनी तसेच उच्चतम प्रतीचा १८ रुपयांनी विक्री होत होता. त्यात आता दरवाढ झाली असून जुन्या कांदा २१ ते २२ रुपये तर नवीन कांदा १९ ते २२ रुपयांना उपलब्ध आहे.