नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी भाजीपाला बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे. थंडीत पोषक वातावरणामुळे उत्पादन जास्त निघत आहे, त्यामुळे अधिक प्रमाणात भाज्या दाखल होत असून दरही ३ ते ४ रुपयांनी उतरले आहेत.
भाजी बाजारात पुणे आणि नाशिक येथून येणाऱ्या मेथीला कमीत कमी ६ ते ८ रुपये आणि जास्तीत जास्त ८ ते १२ रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. याआधी १२ ते १५ रुपये दराने एक जुडी मिळत होती. पालेभाज्यांसाठी थंडीचे वातावरण पोषक असते. थंड हवेत पालेभाज्यांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे या हंगामात पालेभाज्यांचे उत्पादन जास्त होते. पालकला ६ ते ८ रुपये तर कोथिंबीर ७ ते ९ रुपये जुडी पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरी, पालक आणि मेथीची आवक वाढत असून पालेभाज्याचे दर ३-४ रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात मेथीची ४२२ क्विंटल, पालक ५५० क्विंटल तर कोथिंबीर ६८० क्विंटल आवक झाली आह. पालकला ६-८ रुपये तर कोथिंबीरला ७-९ रुपये बाजारभाव आहेत.
