वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात सध्या भाज्यांची आवक वाढली असून दर गगडगडले आहेत. तरीदेखील बाजारात ग्राहक नसल्याने ३०% ते ४०% शेतमाल शिल्लक राहत आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई: ‘त्या’ वादग्रस्त आश्रम चर्चवर अतिक्रमण कारवाई; चर्चच्या फादरवर बाल लैंगिक शोषण प्रकरणी झाली होती कारवाई

एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. नित्याने ५५०-६५० गाड्या भाजीपाला दाखल होत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाले असून ग्राहक नसल्याने दरात ५०% घट झाली आहे. विशेषतः कोबी, वांगी, फ्लावर, वाटाणा, दुधी, टोमॅटो भाज्यांचे दर उतरले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत भेंडी ,गवार ,फ्लॉवर हिरवी मिरची ,शिमला मिरची , वाटाणा, वांगी या भाज्यांच्या दरात घाऊक तसेच किरकोळ बाजारात दरवाढ झालेली होती. आतामात्र घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली असून देखील दरात घसरण झाली आहे, अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली . गेल्या तीन दिवसांपासून बाजारात ग्राहक कमी असल्याने शेतमाला उठाव कमी आहे. त्यामुळे बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे, असे मत भाजीपाला व्यापारी कैलास तांजणे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका

प्रतिकिलो दर (घाऊक दर)

भाजी सध्याचे आधीचे

कोबी ४-५ १६-२०
फ्लावर ६-७ १८-२०
वांगी ५-६ २८-३०
कारली १४-१६ २४-२८
हिरविमिरची १४-१६ ३४-४०
दुधी १०-१२ २०-२४
भेंडी १६-२० ३०-३२
गवार ३०-३२ ४०-४४
हिरवा वाटाणा ३६-४० ५०-६०
टोमॅटो ८-१० १२-१४

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prices of vegetables dropped by fifty percent at the apmc wholesale vegetable market in vashi navi mumbai dpj
First published on: 02-12-2022 at 18:40 IST