पनवेल ः तळोजा कारागृहाच्या सुरक्षेतून बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास २८ वर्षीय बंदी पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस २८ वर्षीय बंदी मुजाहीद गुलजार खान याचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा – कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, घाऊकमध्ये प्रतिकिलो २९ रुपयांवर

हेही वाचा – पनवेल महापालिकेला आर्थिक सक्षम बनवून लोकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य राहील – आयुक्त मंगेश चितळे 

मुजाहिद याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गुरुवारी रात्री याबाबत तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी एकनाथ पाटील यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मोलमजुरी करणारा मुजाहिद हा शिरुर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली होती. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कारागृह पोलिसांच्या ताब्यात असताना कारागृहासमोरील रस्त्यावरुन तो पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कारागृह प्रशासन अधिक चौकशी करीत आहे.