Property tax collection of Navi Mumbai Municipal Corporation has increased as compared to last year | Loksatta

नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य

नवी मुंबई महापालिकेची गेल्यावर्षी सप्टेंबपर्यंत १९५ कोटी वसुली झाली होती. तर यावर्षी आर्थिक वर्षात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ठेवले आहे.

नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महापालिका मालमत्ता कर विभागाने नवी २०२१-२२ आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ६०० कोटी वसुलीचे लक्ष ठेवले होते
मालमत्ता कर विभागाने वर्षाअखेरीस ५६३ कोटीची वसुली केली होती. अखेरच्या ४ दिवसात जवळजवळ ९२ कोटीची वसुली केली होती .यावर्षी पहिल्या ६ महिन्यात पालिकेने गेल्यावर्षी पेक्षा १५ कोटी अधिक वसूल केले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर २०२१ पर्यंत १९५ कोटी वसूल केले होते. परंतु यंदा हीच वसुली १५ कोटी अधिक आहे. यंदा पालिकेने या वर्षाअखेरीस ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात

नवीन आर्थिक वर्षात ८०० कोटी वसुली निश्चित

वर्षभरात ५६२ कोटीची वसुली करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षात ८०० कोटी वसुली निश्चित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी अखेरच्या टप्प्यात पालिकेने थकबादीदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन ढोल वाजवून वसुली केली.तसेच अनेक ठिकाणी अटकावणी करणे नोटीस बजावणे,खाती सील करणे अशी कठोर पावले उचलल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत अखेरच्या टप्प्यात जास्त वसुली झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.त्यामुळे पालिका आयुक्तांनी शेवटच्या टप्प्यात थकबाकीसाठीच्या वसुली करण्यासाठी तगादा लावत वेगवेगळे उपाययोजना करण्यापेक्षा पहिल्या महिन्यापासूनच वसुलीसाठी हे विविध उपाययोजना करण्याचे निर्देश मालमत्ता विभागाला दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने अधिक कर वसुली करून दाखवली आहे. करोनाच्या स्थितीमुळे थकबाकीदारांना करोनाकालावधीतील अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्याच्या दृष्टीने १ ऑक्टोबर २०२१ ते २८ फेब्रवारी २०२२ पर्यंत अभय योजना लागू करण्यात आलेली होती.त्यानंतर १५ ते ३१ मार्चपर्यंत विशेष अभय योजना जाहीर करण्यात आलेली होती.परंतू तरी देखील अनेक थकबाकीदार थकबाकी भरत नसल्याने पालिकेने मार्चमध्ये ढोल वाजवून वसुली सुरु केली होती.

गेल्यावर्षी ढोल वाजवून थकबाकीदारांकडून वसुली

थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन ढोल वाजवून वसुली केल्याने मुदतीच्या शेवटच्या ४ दिवसात ९२कोटीची वसुली पालिकेने केली होती.पालिकेने दिलेल्या विशेष अभय योजने अंतर्गत थकबाकीदार नागरिक, व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक दंडात्मक रक्कमेतील २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात सवलतीचा लाभ मिळाला होता. काही मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांकडून या सवलतीचा लाभ घेण्यासही फारशी उत्सुकता दिसून येत नव्हती.या अनुषंगाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेल्या व विशेष अभय योजनेचा लाभ घेण्यात स्वारस्य न दाखविणा-या थकबाकीदारांवर ढोल वाजवून वसुली तसेच अटकावणी कारवाई केली होती.

हेही वाचा- डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे २ जण गंभीर जखमी तर ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कर चुकवणाऱ्यांवर कारवाई

त्यावर्षी पालिकेने मालमत्ता वसुलीसाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या निर्देशानुसार वेगवान वसुली सुरू केली आहे. नव्या आर्थिक वर्षात थकित मालमत्ताकराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमावलीनुसार मालमत्ता जप्तीची,
बँक खाती गोठविण्याची तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात सर्वात स्वच्छ व सुंदर शहराचा मान सातत्याने महापालिकेला मिळाला आहे. शहरात विकासात्मक कामे करण्यासाठी पालिकेच्या उत्पन्नाचे मालमत्ता कर व जीएसटी परतावा हे मुख्य दोन उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. त्यामुळे मालमत्ताकरातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून शहरात अधिकाधिक लोकोपयोगी विकासात्मक कामे करण्यासाठी अर्थसंकल्पातही या वर्षासाठी पालिकेने ८०० कोटीचे लक्ष ठेवले आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबपर्यंत १९५ कोटी वसुली

नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्षात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ठेवले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबपर्यंत १९५ कोटी वसुली झाली होती. परंतु यावर्षी १५ कोटी जास्त म्हणजे २१० कोटी वसुली झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली. तर मालमत्ता कर वसुली १०० टक्के करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने थकबाकी वसुलीचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : संकलित कचऱ्यातून ६० फूट फ्लेमिंगो प्रतिकृती साकारली !

मागील काही आर्थिक वर्षात पालिकेने केलेली मालमत्ताकर वसुली

वर्ष मालमत्ता कर वसुली

२०१८-१९ ४८१.४० कोटी

२०१९-२० ५५८.९१ कोटी

२०२०-२१ ५२७.८१ कोटी

२०२१-२२ ५६२.७ कोटी

२०२२-२३. २१० कोटी ( पहिल्या ६ महिन्यातील वसुली.)

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात

संबंधित बातम्या

नवी मुंबई : विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
इच्छुकांकडून मतदारांची चाचपणी , मतदार यादी छाननी सुरू
शीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं
“आमचे धंदे बंद करायाला कुणाचे आदेश…”; सुषमा अंधारेंच्या आरोपांवर गणेश नाईकांचं बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 2nd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ?, जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न
भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”
विश्लेषण: सी लिंकवर ८०, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर १०० तर ‘समृद्धी’वर १२०… महामार्गांचं स्पीड लिमिट ठरवतं कोण आणि कसं?
आता संसदेतही गाजणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट होणार आक्रमक