नवी मुंबईतील मसाज पार्लरच्या जागेत वेश्याव्यवसाय | Prostitution in massage parlor premises in Navi Mumbai amy 95 | Loksatta

नवी मुंबईतील मसाज पार्लरच्या जागेत वेश्याव्यवसाय

साडेतीन हजार रुपयांपैकी पिडीतेच्या हाती अवघे दिड हजार रुपये मसाज पार्लरची मालकीन देत होती ; पोलीसांनी उजेडात आणला प्रकार

नवी मुंबईतील मसाज पार्लरच्या जागेत वेश्याव्यवसाय
नवी मुंबईतील मसाज पार्लरच्या जागेत वेश्याव्यवसाय

नवी मुंबईत मसाज स्पा पार्लर या व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सूरु असल्याची पोलखोल पोलीसांच्या एका कारवाईत उघडकीस झाली आहे. राज्यभरातून विविध जिल्हे व शहरातून नवी मुंबई पोलीस दलात नव्यानेच पदभार स्विकारलेल्या विविध उपायुक्तांनी नवी मुंबईचा कारभार हातात घेतल्या घेतल्या कारवाईचा धडाका लावला आहे. रस्त्यावरील जुगारापासून ते लेडीज सर्व्हीस बार आणि आता मसाज स्पा पार्लर अशा सर्वच धंद्याची पोलखोल करण्याचे सत्र सध्या नवी मुंबईत सूरु आहे. यामध्ये शुक्रवारी मानवी अनैतिक व्यापार, अवैध धंदे आणि बालकामगारांवर देखरेख यासाठी नेमलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने खारघर सेक्टर ८ येथील भूमी हाईट्स या इमारतीमधील गाळा नंबर २१ मध्ये गोमती ब्लीस स्पा या मसाज पार्लरवर धाड घालून तेथे सूरु असलेल्या वेश्या व्यवसाय रंगेहाथ उघडकीस आणला.

हेही वाचा >>>कांद्याचे दर आणखीन गडगडणार! सोमवारी एपीएमसी बाजारात प्रति किलो ८ ते १० रुपयांची घसरण

यासाठी पोलीसांनी बनावट ग्राहकाची मदत घेतली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ही धाड टाकल्यावर नवी मुंबईतील अनेक मसाज पार्लरमध्ये वेशा व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले. या धाडसत्रात पोलीसांच्या प्राथमिक तपासात साडेतीन हजार रुपयांमध्ये वेशा व्यवसाय केला जात असून यातील दिड हजार रुपये संबंधित पिडीत मुलीला, पाचशे रुपये पार्लच्या व्यवस्थापकाला आणि शिल्लक एक हजार रुपये मसाज पार्लरची मालकीन स्वताकडे ठेवत असल्याची कबूली पिडीत महिलांनी पोलीसांना दिली. पोलीस निरिक्षक बासित अली सय्यद यांनी ही धाड टाकली. या धाडीनंतर पार्लरच्या मालकीनीच्या दबावाखाली काम करणा-या तीन पिडीत मुलींची सुटका पोलीसांनी केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 18:35 IST
Next Story
कांद्याचे दर आणखीन गडगडणार! सोमवारी एपीएमसी बाजारात प्रति किलो ८ ते १० रुपयांची घसरण