Protest outside Vashi LIC office of Navi Mumbai District Congress against Modi Govt | Loksatta

मोदी सरकार विरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वाशी एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन

वाशी येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

मोदी सरकार विरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वाशी एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन
मोदी सरकार विरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वाशी एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन

नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात वाशी येथे जोरदार आंदोलन केले. वाशी येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने एलआयसीला अदानी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकार अदानी आणि अंबानी साठी काम करत असल्याचा आरोप करत मोदी सरकार हटावचा नारा देण्यात आला.

हेही वाचा- नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित

एलायसीमध्ये देशातील सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी एलआयसी मध्ये आपली बचत म्हणून रक्कम गुंतवली आहे परंतु याच सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम आदानींच्या साहाय्याने मोदी सरकार करत आहे त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे अशा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

हेही वाचा- उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग

देशातील मोठे उद्योगपती असलेल्या अंबानी व अदानी या समूहाच्या आडून मोदी सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहेत त्यांची फसवणूक करत आहेत त्यामुळे अशा फसव्या सरकारचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे नागरिकांना या सरकारची दुसरी काळी बाजू पाहायला मिळत आहे, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 20:01 IST
Next Story
नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित