नवी मुंबई -नवी मुंबई शहरात नवरात्रीच्या आठ दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी शहरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या शहरात विविध उपनगरात पाऊस पडला असून बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद कोपरखैरणे विभागात झाली. सकाळ पासूनच अवकाशात  काळे ढग पसरले होते.

नवी मुंबईत सर्व विभागात दिवसभर काळोख पाहायला मिळाला. शहरात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती.शहरात सायन पनवेल महामार्गासह शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  तर सायन पनवेल महामार्गावरही वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. शहरात दिवसभर नेरुळ ,बेलापूर भागात चांगला पाऊस झाला तर इतर विभागात तुरळक पाऊस झाल्याची मा  माहिती पालिका आप्तकालिन विभागाने दिली .

शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंतचा पाऊस

बेलापूर- २९.८

नेरुळ- १५.४

वाशी- ३.६

कोपरखैरणे- ०.२

ऐरोली- ३.६

दिघा- २.०

सरासरी पाऊस- ९.१०मिमी