नवी मुंबईत भुयारी मार्गात पाणी

रविवारी दुपारपासून नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरांत संततधार सुरू होती. सोमवारी दुपारी चारनंतर पावसाचा जोर वाढत रात्री उशिरापर्यंत जोरधारांचा पाऊस झाला. यामुळे पनवेल व उरणमधील काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नवी मुंबईतही काही भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. या पावसामुळे नवी मुंबई, पनवेल व उरणवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

नवी मुंबई : सोमवारी नवी मुंबई शहरासह मोरबे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत १२ तासांत शहरात १२४ तर मोरबे पाणलोट क्षेत्रात १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी दुपारपासूनच पावसाचा जोर वाढल्याने शहराची गती मंदावली होती. काही भयारी मार्गात पाणी साचले होते तर काही ठिकाणी वृक्षही पडले आहेत. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती कक्षाकडे कुठेही पाणी साचल्याची नोंद नव्हती. 

नवी मुंबई शहर व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात पावसाचा जून महिना कोरडाच केला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीपातळी खाली गेल्याने पाणीकपात प्रस्तावित आहे; परंतु मागील दोन दिवसांत शहरात व मोरबे परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने पालिका प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही धरण ५ मीटर पाणीपातळी खाली आहे. नवी मुंबई शहरात सकाळपासून रिपरिप तर दुपारपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतूक मंद गतीने सुरू होती. काही प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नेहमीप्रमाणे ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे उड्डाणपुलाखाली, तुर्भे पोलीस ठाणे आणि कोपरखैरणे  रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचले होते. मात्र लगेच निचरा झाल्याने त्याचा वाहतुकीवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे दमदार पाऊस होत असला तरी  नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू होते. काही भुयारी मार्गातही पाणी साचले होते. महामार्गवरून सानपाडा गावात जाणारऱ्या भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला होता.  वाशी कोपरखैरणे रस्त्यावर कोपरखैरणेच्या दिशेने वाशी येथे एका बाजूला पाण्याचे तळे साचले होते. एनएमएमटी व बेस्टच्या प्रवाशांची काही प्रमाणात  गैरसोय झाली. काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. शाळेतून घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र पावसाचा आनंद घेतल्याचे दृश्य शहरात होते. मात्र महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबईकरांनी या पावसाचा आनंद घेतला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोरबे धरण परिसरातील पावसाचे प्रमाण कमीच आहे.  मोरबे धरणातील पाणीपातळी खाली असून २३ ऑगस्टपर्यंतच पुरेल एवढे धरणात पाणी आहे.तर धरण भरण्यासाठी ४००० मिमी पावसाची आवश्यकता आहे.

आज नवी मुंबई शहरातही दुपारपासून जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. शहरात कोपरखैरणे परिसरात झाड पडल्याची घटना घडली तर पाणी तुंबल्याची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नव्हती. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण गेल्या वर्षी दमदार पावसाने २९ सप्टेंबर २०२१ ला पूर्ण भरले होते. गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती; परंतु यंदा जुलै महिना सुरू झाल्यानंतर पावसाने सुरुवात केली असल्याने  धरणातील पाण्याची पातळी खालीच आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच मोरबे धरण परिसरात जवळजवळ १ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तिथे फक्त ४५० मिलिमीटर  पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण २०२० पूर्वी २०१७ ते २०१९ सलग तीन वर्षे भरल्याने  हॅट्ट्रिक साधली होती. त्यानंतर २०२१ ला धरण भरले होते. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते; परंतु धरणात अद्याप पाणीपातळी कमीच आहे.

यंदा धरण परिसरात कमी पाऊस पडत असून कमी पावसामुळे चिंता कायम आहे; परंतु पाणीकपातीबाबत अद्याप पुढील काही दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका असून तात्काळ पाणीकपात करण्यात येणार नाही. पाणीपुरवठय़ाबाबत योग्य नियोजन करण्यात येत आहे. मोरबे धरण परिसरात आज १२ तासांत १०० मिमी पाऊस पडला आहे. यापुढेही असाच पाऊस पडल्यास दिलासा मिळेल.

संजय देसाई ,शहर अभियंता, महापालकिा

धरणसाठय़ांत वाढ ; दोन दिवसांच्या पावसामुळे दिलासा

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही सोमवारी चांगला पाऊस झाला, त्यामुळे खालावलेल्या धरण पातळीत वाढ झाली. आणखी दोन दिवस पाऊस झाल्यास नवी मुंबईत एक तास पाणीकपातीचे केलेले नियोजन करण्याची गरज भासणार नाही.  पनवेलला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण भरून वाहून लागले आहे. तर उरणचे रानसई धरण्याच्या पाणीसाठय़ातही लक्षणीय वाढ झाली आहे.

देहरंग धरणसाठय़ात लक्षणीय वाढ

पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणात दोन दिवसांतील पावसामुळे पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पनवेलकरांवरील पाणी कपात तूर्तास मिटली आहे.

 देहरंग धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ३.५७ दशलक्ष घनमीटर आहे. सोमवारी दुपापर्यंत धरणात अडीच दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली. पनवेलकर गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. पनवेल तालुक्यात रविवार ते सोमवारी दुपापर्यंत २४ तासांत ४५.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरातील पाऊस

(सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच )

* बेलापूर : १२२.८० मिमी

* नेरुळ : १४८.५० मिमी

* वाशी : १३०.८० मिमी

* ऐरोली : १६५.५० मिमी

* कोपरखैरणे :८१.२० मिमी

* दिघा : ९६.२० मिमी

* एकूण सरासरी : १२४.१६ मिमी