लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबई पोलीसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणातील पिडीत महिलांना खुषखबर दिली आहे. सोनसाखळी चोरट्यांनी नवी मुंबईत धुमाकुळ घातला असून दिवसाला एक तरी सोनसाखळी चोरी होत आहे. मागील तीन महिन्यात ३४ वेगवेगळ्या घटना सोनसाखळी चोरीच्या नवी मुंबईत घडल्या आहेत. खारघर पोलीसांनी चार चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून १२ सोनसाखळी चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. चोरट्यांकडून तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केल्याची माहिती बुधवारी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पनवेल येथे दिली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

फेब्रुवारी महिन्यात खारघर वसाहतीमधील झेंडे कुटूंबिय रात्री १० वाजता सेक्टर १२ येथील पायी चालत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी झेंडे कुटूंबातील तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. पोलीस पथक या चोराच्या मागावर होते. या गुन्ह्यात कल्याण येथील आंबिवली परिसरातील मंगलनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीला पोलीसांनी अटक केली. या संशयीत आरोपीने खारघर परिसरात तीन गुन्हे केल्याची कबूली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी दिली. तसेच खारघर पोलीसांनी सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमले होते. या पथकामध्ये पोलीस अधिकारी विवेक दाभोळकर, मानसिंग पाटील, शिरीष यादव पोलीस कर्मचारी फीरोज आगा, प्रशांत जाधव, अंकुश खेडकर, सचिन सूर्यवंशी, लवकुश शिंगाडे, सचिन डाके, राज वाठोरे, दिपा चव्हाण यांचा समावेश होता.

आणखी वाचा- नवी मुंबई: पुन्हा एकदा नव्याने बसविण्यात आलेला विजेचा खांब निखळून पडला!

या पथकाने फेब्रुवारी महिन्यात चोरट्यांनी सेक्टर ४ येथील रस्त्यावर मैत्रिणीसोबत बोलणा-या कुमूदिनी अहिरे यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाची सोनसाखळी चोरली होती. पोलीसांचे पथक सीसीटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून वसाहतीमध्ये चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना संशयीत व्यक्ती आढळल्या. या संशयीतांकडील दुचाकीचा माग घेण्यासाठी पोलीसांनी विशेष परिश्रम घेतले. अखेर चोरटे पोलीसांच्या हाती लागले. खारघर वसाहतीमध्ये हे चोरटे राहत असल्याचे पोलीसांच्या तपासात सिद्ध झाले.

यापुर्वी खारघर वसाहतीमध्ये सोनसाखळी चोरी प्रकरणातील सराईत फयाज शेख या संशयीताशी या दोन चोरट्यांचा संबंध असल्याचे सिद्ध झाले. तीन आरोपींना पोलीसांनी खाक्या दाखविल्यावर त्यांनी पाच खारघर, एन.आर.आय. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि वाशी तसेच नेरुळ प्रत्येकी एक असे नऊ सोनसाखळी चोरी केल्याचे कबूल केले. सध्या हे चोरटे पोलीसांच्या ताब्यात असून पोलीसांनी चोरट्यांकडून मुद्देमालक जप्त केला आहे. चोरट्यांकडील ३० हजार रुपयांची दुचाकी सुद्धा पोलीसांनी जप्त केली आहे. लकरच हे सोने पिडीत महिलांना परत देण्याची कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.