scorecardresearch

पनवेल-उरण मार्गावरील खड्डे दुरुस्ती

उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्डयांमुळे नागरिकांना प्रवास करीत असताना त्रास होत असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.

उरण : उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्डयांमुळे नागरिकांना प्रवास करीत असताना त्रास होत असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पावसाळय़ात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार वसाहत आदी ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले होते. त्यामुळे येथील नागरिकांना खड्डे व धुळीतून प्रवास करावा लागत होता. ही नागरिकांची समस्या ‘लोकसत्ता’ने मांडली होती. त्याची दखल घेत संबंधित विभागाने तातडीने रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Repair pits panvel uran road bokadvira jnpt workers colony amy

ताज्या बातम्या