सकाळी व संध्याकाळी गर्दीच्यावेळी वाहनांच्या वाढत्या संख्येने वेग थंडावला

नवी मुंबई</strong> : शीव पनवेल महामार्गावरील नेरुळ येथील उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाच्या उड्डाणपुलाचे काम मागील आठवड्यापासून ते १५ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच २ महिने सुरु राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूककोंडीला नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याच महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे कोंडी  कमी करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने कारचालकांना वाशी येथून पामबीच मार्गावरुन सीबीडीला जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सायन पनवेल महामार्गावरील अनेक वाहने पामबीच मार्गावर येत असल्याने पामबीच मार्गावरही वाहनांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे या वेगवान मार्गाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
Looting on the Mumbai Ahmedabad highway by Angadian
महामार्गावर अंगाडियांकडून सव्वा पाच कोटींची लूट; धारावीचा कुख्यात डॉनसह चौघांना अटक
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी

मुंबई व लगतच्या सर्व महापालिकाक्षेत्रात वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मेट्रो,मोने रेल्वे तसेच हजारे उड्डाणपुल निर्मितीकरुन वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका करण्यासाठी करोडो खर्चातून प्रकल्प उभारले जात असताना रस्त्यावरील वाहतूक व सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी फुटता फटत नाही. सायन पनवेल महामार्गावर नेरुळ तसेच पुढे कळंबोली जवळील महामार्गावरील रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना काही मिनिटांच्या प्रवासाकरीता अनेक तासांच्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई शहरातील पामबीच मार्ग हा शहरातील अंतर्गत वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळवण्यासाठी केली आहे. परतू या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: १५ फेब्रुवारी पर्यंत शीव पनवेल मार्गावरील नेरूळ ते शिरवणे सेवा रस्ता बंद

महामार्गावरील दुरुस्तीकामामुळे व वाहने पामबीच मार्गाने वळवण्यात आल्याने वाशी उड्डाणपुलाखालून पुढे मोराज सर्कल ,नेरुळ सारसोळे सिग्नल, वजरानी चौक, चाणक्य चौक, अक्षर चौक, एनआरआय चौक आणी किल्ले गावठाण चौकपर्यंत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे १५ वेगवान असलेल्या या पामबीच मार्गावरही वाहनांच्या वाढत्या बोजामुळे वेगवान पामबीच मार्गाचा वेगही मंदावला आहे. या मार्गावरुन ताशी ६० किमी वेगाने वाहने चालवण्यास अनुमती आहे. परंतू वाहनांच्या कमी संख्यामुळे बेफामपणे  १०० ते १३०च्या पुढेही वेगाने वाहने चालवली जातात. त्यामुळे या मार्गावर अनेकदा मोठे अपघात झाल्याचे चित्र आहे. सायन पनवेल मार्गावरील कार आता पामबीच मार्गावर येऊ लागल्याने पामबीच मार्गावरही गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत आहे.त्यामुळे या मार्गावरही सकाळ संध्याकाळच्यावेळेत मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतूककोंडी होऊन वाहतूक मंदावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: एपीएमसी मधील फळविक्रेत्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापार बंद; हल्लेखोराच्या अटकेची मागणी अन्यथा…

पामबीच मार्गावरील वेगावर मर्यादा ठेवा….

जोपर्यंत सायन पनवेल मार्गावरील नेरुळजवळील उड्डाणपुलाच्या कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शहराअंतर्गत पामबीच मार्ग तसेच इतर मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर वेगाने वाहन चालवण्याची सवय मर्यादेत ठेवावीच लागेल असे चित्र आहे.

महामार्गावरील दुरुस्तीमुळे पामबीच मार्गाचा वापर केला जात आहे. परंतू पामबीच मार्गावरही वाहनांची संख्या वाढल्याने सकाळी व सायंकाळी मार्गावरही वाहतूक  वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन कार्यालयात जाण्यास विलंब होत आहे.

-अनिल चव्हाण, वाहनचालक

शीव पनवेल महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे कार पामबीच मार्गावरुन जाण्याची सूचना केली आहे. वाहनचालक पामबीच मार्गाचा वापर करत आहेत. तसेच वाहतूक विभागामार्फतही वाशी टोलनाक्यापासूनच याबाबत फलक लावण्यात आले आहेत. वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभाग सदैव तत्पर आहे.

-तिरुपती काकडे, उपायुक्त वाहतूक विभाग