scorecardresearch

रिझव्‍‌र्ह बँकेचा सहकारी बँका, पतपेढय़ांकडे बघण्याचा दृष्टिकोन अनाकलनीय!; शरद पवार यांचे प्रतिपादन

शिवकृपा सहकारी पतपेढीच्या शिवकृपा भवन या एमआयडीसी रबाळे येथील वास्तूचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवकृपा सहकारी पतपेढीच्या शिवकृपा भवन या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया-नरेंद्र वास्कर)

शरद पवार यांचे प्रतिपादन

नवी मुंबई: देशभरात सहकार क्षेत्रात महाराष्ट्र व गुजरातचा नावलौकिक मोठा आहे. परंतु दुसरीकडे देशात सर्वात मोठी बँक असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेचा सहकारी बँका व पतपेढी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अनाकलनीय असून याबाबत अनेक प्रश्न असून या सहकार क्षेत्राचे प्रश्न देशाच्या सहकारमंत्र्यांकडे मांडून मार्ग काढण्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले.

शिवकृपा सहकारी पतपेढीच्या शिवकृपा भवन या एमआयडीसी रबाळे येथील वास्तूचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे विजय चौगुले, शिवकृपा बँकेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव भागातून येऊन शिवकृपा पतपेढीला  महत्त्व प्राप्त करून देण्यात कृष्णा शेलार व सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. या वेळी शरद पवार यांनी शिवकृपा भवन वास्तूमधील सभागृहाला यशवंत सभागृह नाव देण्याचे सूचित केले व संस्थेच्या वतीनेही हे  मान्य करण्यात आले.

कोणत्याही बँकेचा  व्यवहार हा किती कोटींचा आहे हे महत्त्वाचा नसून त्या बँकेचा एनपीए अर्थात कर्ज थकबाकी किती टक्के आहे त्यावर त्या बँकेचे यश ठरते.  शिवकृपा पतपेढीने आपल्या कारभारातून कर्ज थकबाकी कमी राखण्यात यश मिळवल्याबद्ल पवार यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reserve bank co operative banks credit unions incomprehensible ncp sharad pawar akp

ताज्या बातम्या