तळोजाला नापंसती; सिडकोच्या ८८७ घरांसाठी फक्त ३४८ अर्ज

सिडको मंडळाने ४४८८ घरांची सोडत १५ ऑगस्टला जाहीर केली होती. त्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

सिडकोच्या ८८७ घरांसाठी फक्त ३४८ अर्ज

पनवेल : सिडकोने करोना योद्ध्यांसाठी काढलेल्या गृहसोडतीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी सिडकोने दोन लाख रुपयांची अट ठेवल्याने या

सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र नेमके किती अर्ज आले याची आकडेवारी सिडकोने जाहीर केली नव्हती. शुक्रवारच्या सोडतीच्या निकालावेळी संबंधित आकडेवारी जाहीर करणे सिडकोला भाग पडले. त्यात तळोजात ८८७ घरांसाठी फक्त ३४८ अर्ज आले आहेत. तळोजा वसाहतीमध्ये सेक्टर २१, २२ आणि ३४ येथे गृहप्रकल्प सिडकोने बांधले आहेत. मात्र येथील पाण्याची समस्या आणि प्रदूषणाच्या त्रासामुळे या ठिकाणी घर का घ्यावो असा प्रश्न अर्जदारांच्या मनात आहे.

सिडको मंडळाने ४४८८ घरांची सोडत १५ ऑगस्टला जाहीर केली होती. त्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. सोडतीमध्ये सहभागी होणाऱ्यांना दोन लाख रुपयांची अट घातल्याने अनेक करोना योद्धे या सोडतीपासून दूर राहीले. त्यासाठी सिडकोने विविध बँकांच्या सहकार्याने करोना योद्ध्यांसाठी दोन लाख रुपयांची तातडीचे कर्ज योजना आणली. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे. प्रदूषण आणि पाणीटंचाईमुळे तळोजा परिसर बदनाम आहे. त्यामुळे भविष्यात सिडकोला या परिसरात पाणी रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांवर अधिकचे लक्ष द्यावे लागेल. वाहतूक सुविधा ही एक महत्त्वाची बाब आहे.

सध्या येथील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या वसाहतीत जाण्यासाठी मुंब्रा-पनवेल महामार्गावरून आणि दिवा-पनवेल लोहमार्ग ओलांडून थेट तळोजा वसाहतीमध्ये जावे लागते. मात्र यासाठीच्या उड्डाणपुलाचेही काम रखडलेले आहे. याचा फटका या सोडतीला बसल्याचे बोलले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Results of cidco eviction of corona warriors were announced on friday akp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news