रिक्षा मनमानीला चाप

शहरातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाल्याने वाशी उप प्रादेशिक विभागाकडून गेली तीन दिवस रिक्षाचालकांवर कारवाई मोहिम हाती घेतली.

‘आरटीओ’कडून शहरातील रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे.

‘आरटीओ’कडून ७७ रिक्षा जप्त; परवाना नसतानाही वाहतूक

नवी मुंबई : शहरातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाल्याने वाशी उप प्रादेशिक विभागाकडून गेली तीन दिवस रिक्षाचालकांवर कारवाई मोहिम हाती घेतली. यात साध्या वेशात प्रवाशी बनून आरटीओच्या अधिकाऱ्यांनी प्रवास केला. यात रिक्षाचालकांची ही मनमानी मोठया प्रमाणात समोर आली. यामुळे वाशी व सानपाडा विभागातील ७७ रिक्षा आरटीओकडून जप्त करण्यात आल्या आहेत. 

यापुढेही अचानकपणे अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले. शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरुळ, इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. मनमानी आणि आडमुठेपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी मनमानीपणे भाडे आकारणी तर कधी भाडे नाकारले जाते आहे. काही रिक्षाचालक तर मीटर डाऊन

करिता मनमानी भाडे घेत आहेत. आशा मुजोर रिक्षा चालकांबाबत तक्रारी आल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाने अचानक साध्या वेशात प्रवासी बनून या तक्रारींची पडताळणी केली. यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून

आले. तसेच गणवेश परिधान न करता रिक्षा चालवल्या जात होत्या तर अनेकांकडे परवाना नसताना वाहतूक केली जात होती. त्यामुळे आशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक मोटार निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि मोटार वाहन निरीक्षक गजानन गावंडे, प्रशांत शिंदे, रश्मी पगार, विद्य शिंदे, आशिष दारगोडे, अनुप सानप यांचा समावेश होता. नोटिसींना प्रतिसाद न दिल्यास परवाने रद्द मंगळवारीपासून वाशी आणि सानपाडय़ातील अशा ७७ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. या रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्या रिक्षाचालकांना नोटीस बाजाविण्यात आली आहे. या  नोटिसींना प्रतिसाद दिला नाही तर त्यांचे परवाने निलंबित केले जाणार असल्याची माहिती ‘आरटीओ’नी दिली.

जादा भाडे आकारणी, भाडे नाकारणे इत्यादी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने ‘आरटीओ’ने शहरातील रिक्षाचालकांवर अचानकपणे साध्या वेशात जात प्रवासी बनून ही कारवाई करण्यात आली आहे. ७७ रिक्षांवर कारवाई करून त्यांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. पुढेही अचानकपणे अशा रिक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे.

-हेमांगी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rickshaw arbitrary pressure ysh