जुजबी ओळखीच्या महिलेचा नेहमीच पाठलाग करणाऱ्या आरोपीला १ वर्ष ३ महिने सश्रम कारावास आणि रुपये दोन हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०२० मध्ये या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता  वाशी न्यायालयात दोष सिद्ध झाल्यावर सोमवारी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. मोहम्मद शमीम सुलेमान याच्या विरोधात २०२० मध्ये विनयभंग प्रकरणी  गुन्हा दाखल झाला होता.

सुलेमान याचे वाशीत टेलरचे दुकान होते तर त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा तो नेहमी पाठलाग करत असे. काही दिवसांनी पीडितेने घर सोडले व कुटुंबिया समवेत अन्यत्र राहू लागली . तिचा पत्ता शोधून पुन्हा सुलेमानने तिचा पाठलाग सुरू केला हा प्रकार एक वर्ष चालला शेवटी कंटाळून पीडितेने सुलेमानच्या विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रेश्मा मोमीन यांनी काम पाहिले. तर न्यायालय कारकून म्हणून पोलीस नाईक धीरज सूर्यवंशी आणि प्रदणेश कोठेकर यांनी काम केले.तर सरकारी वकील श्रीधर फटाके यांनी पीडितेची बाजू मांडली. सदर खटला न्यायमूर्ती विकास बडे यांच्या न्यायालयात चालला.