भारत पेट्रोलियम प्रकल्पाशेजारील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा

उरण येथील भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस भरणा प्रकल्पातून गॅस व सिलिंडर भरून तो देशभरात पोहोचविला जात असून त्याकरिता येणारे गॅस टँकर व सिलिंडर वाहने येथील मार्गावर दोन्ही बाजूने उभी केली जात होती.

अनेक तक्रारीनंतर अखेर वाहने उभी करण्यास मनाई

उरण : उरण येथील भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस भरणा प्रकल्पातून गॅस व सिलिंडर भरून तो देशभरात पोहोचविला जात असून त्याकरिता येणारे गॅस टँकर व सिलिंडर वाहने येथील मार्गावर दोन्ही बाजूने उभी केली जात होती. ही वाहने सध्या हटविण्यात आली आहेत. सध्या या मागार्ने उरणमधील सार्वजनिक वाहतूक होत आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी मोकळा झाला आहे. येथील वाहने हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून येथील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारत पेट्रोलियम प्रकल्पाला लागून असलेल्या मार्गावर दररोज शेकडो वाहने उभी केली जात होती. त्यामुळे या मागार्वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडी तसेच इतर अडचणींना समोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे अपघातही होत होते. त्यामुळे ही वाहने हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यासाठी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने अनेकदा निवेदनेही देण्यात आली होती. तसेच उरणमधील वाहतूक पोलिसांकडूनही रस्त्यात उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. ही वाहने हटविण्याच्या मागणीनंतर भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाकडून ही वाहने हटवून वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. तसेच सिडकोनेही वाहने उभी न करण्याच्या सूचना देणारे फलक बसविले आहेत. त्यामुळे सध्या हा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road bharat petroleum project open traffic ysh

Next Story
पालिकेचे अंदाजपत्रक यंदा घसरणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी