नवी मुंबई शहरातील दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम डावलून असुरक्षित पणे रस्त्यावर वाहने चालवली जातात. त्यामुळे कित्येकदा अपघाताला निमंत्रण दिले जाते . हा अपघात काहींच्या जीवावर ही बेतो तर काही जखमी होत असतात . वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर एप्रिल २०२२ पासून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ५ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई केलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट न वापरणारे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे, डोन्ट ड्रंक अँड ड्राईव्ह याविषयी जनजागृती केली जाते. त्यांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जाते. तरी देखील वाहन चालक वाहतूक नियमांना पायदळी उडवून बेदारकपणे वाहने चालवत असतात. कित्येकदा दुचाकीस्वार लांब पल्याच्या किंवा लहान पल्याच्या रस्ता गाठण्यासाठी देखील हेल्मेट न वापरण्याला पसंती देत असतात. परिणामी अनावधानाने अपघाताला निमंत्रण मिळते आणि हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते. त्याचबरोबर चारचाकी वाहन चालक देखील सीटबेल्ट न वापरता बेशिस्तपणे वाहन चालवतात . शिवाय वाहन चालवताना मोबाईलवर देखील बोलत असतात . त्यामुळे यादरम्यान नजर हटी दुर्घटना घटी अशा घटना घडत असतात. त्यामुळे हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: इनऑर्बिट वाशी येथील फन फॅक्टरीत बालदिन साजरा

एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ५७९९ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेट आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, रिफ्लेक्टर शिवाय वाहन चालवणे इत्यादी त्रुटी असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर १७९३ वाहनांचे परवाने ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

नवी मुंबई शहरातही दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाने कारवाईचा धडका सुरू केलेला आहे. एप्रिल पासून ते ऑक्टोबरपर्यंत ५ हजारांहुन अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही ही कारवाई अशीच सुरु राहणार असून काही वाहन चालकांचे परवाने देखील ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले आहेत. – हिमांगी पाटील ,उपप्रादेशिक अधिकारी ,आरटीओ नवी मुंबई.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतीच्या वर्चस्वावरुन अंबरनाथमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी पंढरी फडकेला अटक

कारवाई प्रकार- वाहन कारवाई

विना हेल्मेट २५०१
सीटबेल्ट १४५
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे २५४
योग्यता प्रमाणपत्र नसणे १६३१
सिग्नल तोडणे ८२
अवैध प्रवासी वाहतूक २५
रिफ्लेक्टरशिवाय वाहन चालवणे ८६५
अतिरिक्त अवजड वाहने २९१
एकूण ५७९९

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto action against violators of traffic rules in navi mumbai news tmb 01
First published on: 14-11-2022 at 19:25 IST