लोकसत्ता,पूनम सकपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील पामबीच मार्ग, शिव-पनवेल , ठाणे-बेलापूर या महामार्गावरील भरधाव वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनाची करडी नजर असून  मागील दीड वर्षात  स्पीड गनच्या माध्यमातून ११ हजार २३७ भरधाव वाहनांवर कारवाई केली असून ३७ लाखाहुन अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : शहरातील पालिकेची ७८ खेळाची मैदाने विभाग कार्यालयाकडून विकासात्मक कामासाठी क्रीडा विभागाकडे

आजमितीला वाहन अपघाताच्या असंख्य घटना समोर येत आहेत. यात काही वाहने अतिवेगाने  चालविणे, त्यात गाडीवरील ताबा सुटून अपघाताच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. नवी मुंबई शहरातील पामबीच मार्गावर तर वाहने सुसाट चालविले जातात. त्यामुळे या मार्गवर नित्याने अपघात होतात. त्यामुळे वाहन चालकांनी वेग मर्यादेत वाहने चालविण्यासाठी तसेच आशा बेदिक्कतपणे भरधाव वाहने चालकांवर वचक ठेवण्यासाठी आरटीओ स्पीड गनच्या माध्यमातून नजर ठेवत असून नोव्हेंबर २०२१ पासून आतापर्यंत ११ हजार २३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यांवर दररोज वेगमर्यादेच्या उल्लंघन करणाऱ्या आशा वाहनांवर कारवाई केली जात आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मागील वर्षभरापासून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून वाहनांवर कारवाई करून ३७ लाख ४७हजार ३००  रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. पामबीच मार्गावर ६०किमी वेग मार्यदा असून याचे उल्लंघन करणाऱ्या सुसाट वाहन चालकांना कारवाईच्या माध्यमातुन ब्रेक लावला जात आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनानाकडून मुख्य रस्ते , महामार्गावरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. आरटीओताफ्यात आता स्पीड गन असून याच्या माध्यमातून अधिक कडक अंमलबजावणी होत आहे.

हेमांगी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto action on more than 11 thousand vehicles for rash driving in navi mumbai zws
First published on: 08-02-2023 at 19:10 IST