scorecardresearch

नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर आरटीओची करडी नजर ; १५ रॅपिडोवर कारवाई

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई शहरात दुचाकी वरून  बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे.

नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर आरटीओची करडी नजर ; १५ रॅपिडोवर कारवाई
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर कारवाई

शासनाकडून दुचाकीवरून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो बाईकवर बंदी करण्यात आली असून त्याअनुषंगाने  वाशी उपप्रादेशिक परिवहनाकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत आहे . आतापर्यंत १५ रॅपिडो बाईकवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात ही वारंवार अवैध प्रवासी वाहतूक, अवैध माल वाहतूक सुरूच असते. त्यावर आरटीओ कडून वारंवार कारवाई ही केली जाते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई शहरात ही दुचाकी वरून  बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा >>> पनवेलः शाळेच्या निष्काळजीपणाविरोधात पालकाने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला

सध्या डिजिटल युग सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व सोयी सुविधा, खरेदी इत्यादी बाबी ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. सध्या प्रवाशांना सुखकर प्रवासाठी ओला,उबेर यासारख्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास झटकन आणि विना मेहनत लगेच होत आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकी बाबत नवनवीन ऍप सुविधा उपलब्ध होत आहेत. ओला उबेर प्रमाणे ओ ऑटो हे ऍप उपलब्ध झाले आहे. त्याच बरोबर  शहरात अशाच प्रकारे रॅपिडो बाईक या ऍपच्या माध्यमातून दुचाकी वरून बेकायदेशीर प्रवासी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रॅपिडो बाईकला बंदी घातली आहे. त्यामुळे वाशी आरटीओ विभागाकडून यावर अधिक करडी नजर ठेवण्यात येत असून आता पर्यंत  १५  दुचाकीवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 18:47 IST

संबंधित बातम्या