scorecardresearch

उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा

उरण येथील खोपटा कोप्रोली मार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा
उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा

उरण येथील खोपटा कोप्रोली मार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे उरण मध्ये आता जेएनपीटी प्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागाला ही कंटेनर वाहनांचा विळखा पडू लागला आहे. परिणामी येथील नागरिकांना जड वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : सत्तेसाठी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेएनपीटी बंदरावर आधारित कंटेनर मधील माल साठवणुकीसाठी उभारण्यात आलेली. गोदामे ही पूर्वी उरणच्या पश्चिम विभागातच होती. मात्र ती सरकून सध्या खोपटा खाडी पलीकडील पूर्व विभागातही उभी राहिली आहेत. या गोदामांची संख्या वाढू लागली आहे. उरण तालुक्यातील खोपटा,कोप्रोली,चिरनेर,कळबूसरे, विंधणे, भोम टाकी,दिघोडे,वेश्वि,चिर्ले,जांभुळपाडा आदी गावात ही गोदामे उभी राहत आहेत. त्यामुळे बंदरातून मालाची ने आण करणारी शेकडो जड कंटेनर वाहने या भागातील रस्त्यावरून प्रवास करू लागली आहेत. गोदामात ये जा करणाऱ्या कंटेनर वाहने उभी करण्यासाठी गोदामात वाहनतळ नसल्याने ही कंटेनर वाहने सध्या येथील रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे या मार्गवर अपघात व कोंडी यांना येथील प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2022 at 16:14 IST

संबंधित बातम्या