एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे साडेचार तास बसलो होतो, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून शिवतारे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील शिवतारे यांच्या विधानाचा समचार घेतला आहे. शिवतारे यांचे नशीब फुटले आहे. आगामी काळात त्यांना ते समजेलच, असे संजय राऊत म्हणाले. ते आज (२५ डिसेंबर) नवी मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन शाखांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >>> अत्याचाराची तक्रार करणाऱ्या महिलेचा दाऊद गँगशी संबंध? राहुल शेवाळेंच्या दाव्याने खळबळ, नवाब मलिकांचे नाव घेत म्हणाले…

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

“सर्व गोष्टी पैशांने विकत घेता येत नाहीत. समोर बसलेले श्रोते शिवसेनेचे धन आहे. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. आपण बंडखोरी केली पाहिजे याचे बीज मीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात भरवले, असे एक माजी मंत्री म्हणाला. अरे तुझं नशीब फुटलं आहे. तू फुटला नाहीस. भविष्यात तुम्हाला कळेल,” असे संजय राऊत म्हणाले.

“संजय राऊत जे बोलतो ते घडंत. मला भविष्यात काय घडणार याची माहिती आहे. महाभारतात जसा एक संजय होता, अगदी तसाच एक संजय शिवसेनेत आहे. हा संजय कायम कुरुक्षेत्रावरच असतो. लढत असतो,” असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> “शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं” म्हणणाऱ्या शिवतारेंवर उद्धव ठाकरेंच्या आतेबहीण संतापल्या; म्हणाल्या, “पुरंदरच्या बापूला…”

विजय शिवतारे काय म्हणाले?

मुंबईतील एका सभेत बोलताना, एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं, असा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. “२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, ते राज्याच्या हिताचे नव्हते. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजयबापू शिवतारेंनी घातलं”, असे शिवतारे म्हणाले होते. तसेच “महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार आले पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.