नवी मुंबई : खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला आग लागली. घटनेचे गांभीर्य वेळीच लक्षात आल्याने चालक आणि मदतनीस यांनीं विद्यार्थ्यांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना खारघर सेक्टर १५ येथे साडेबाराच्या सुमारास घडली. सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेची बस असून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बस ज्यावेळी खारघर सेक्टर१५ येथे आली त्यावेळी बोनेट मधून जळल्याच्या वास आणि पाठोपाठ धूर निघाला त्याच वेळी प्रसंगावधान राखत बस चालक आणि मदतनीस यांनी पटापट सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवले व लांब अंतरावर एकत्रित उभे केले. दरम्यान बसने पेट घेतला होता. या बाबतची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल घटनास्थळी पोहचहले व त्यांनी आगीवर नियंत्रण अर्ध्या तासात मिळवले सध्या त्याचे कुलिंगचे काम सुरू आहे. सर्व विद्यार्थी, चालक आणि मदतनीस सुखरूप आहेत. अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus carrying students school caught fire kharghar students are safe helper and driver tmb 01
First published on: 12-09-2022 at 14:22 IST