नवी मुंबई  :  ऑक्टोबर २०२१ पासून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा बंद करण्यात आले होते, तर डिसेंबरपासून सर्व विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता एप्रिलमध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षादेखील ऑफलाइन करण्याचे नियोजन शाळांचे आहे. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या ऑफलाइन परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    करोनाच्या पार्श्वभूमीवर दीड ते दोन वर्षे शाळा, महाविद्यालय शिक्षण हे ऑनलाइनच सुरू होते. मात्र करोनाच्या पहिल्या लाटेनंतर शाळा सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र अचानकपणे करोनाबाधित रुग्णसंख्या वाढत गेल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात आली नाही. मात्र दुसऱ्या लाटेनंतर अखेर ४ ऑक्टोबरपासून नवी मुंबईतील शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र करोनाने डोके वर काढले आणि शहराला तिसऱ्या लाटेने गाठले. त्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या, परंतु २४ डिसेंबरपासून पुन्हा बालवाडीपासून ते महाविद्यालयपर्यंत ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांत ऑफलाइन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. तसेच काही विद्यार्थी ऑनलाइन वर्गात शिकत आहेत. मात्र ऑफलाइन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती आधिक आहे. वार्षिक परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतचा निर्णय हा त्या त्या शाळेने घ्यावा. महापालिका शाळांत ऑफलाइन परीक्षा होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे त्यांना ऑनलाइन परीक्षाही देता येणार आहे.

 – जयदीप पवार, शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools navi mumbai actual examination students teacher parents ysh
First published on: 26-02-2022 at 00:02 IST