न्हावा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

उरण : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाचे असणारे न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाचे काम सुमारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असले तरी खरे बाधित असलेल्या न्हावा आणि न्हावाखाडी येथील ७८९ बाधित स्थानिक मच्छीमारांना आश्वासन देऊन अद्यापही नुकसान भरपाईच मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या न्हावा ग्रामस्थांनी येत्या १४ मार्चपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या शिवडी-न्हावा सी-लिंक प्रकल्पाचे काम बेमुदत बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा सर्व पक्षीय ग्रामस्थांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. एमएमआरडीएकडे विनंती केली होती.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

ग्रामस्थांच्या विनंतीनुसार २६ मार्च २०२१ रोजी एमएमआरडीएने  ग्रामसभा घेऊन आर्थिक नुकसानीसाठी पात्र असलेल्या मच्छीमारांची यादी तयार करण्याचे ग्रामपंचायतीला कळविले होते. त्यानुसार २ आक्टोबर २०२१ रोजी एमएमआरडीए, मत्स्यविभाग, पोलीस आदी विभागांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत एकूण ७८९ बाधित मच्छीमारांची यादी तयार करण्यात आली होती.     

न्हावा आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावे ही न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाच्या दोन किमी अंतरावर आहेत. या गावातील बहुसंख्य लोकांचा पारंपरिक मासेमारी हाच व्यवसाय आहे.  या प्रकल्पामुळे मात्र येथील लोकांचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या गावातील बहुतांश लोकांची मासेमारीवरच उपजीविका होत आहे. त्यामुळे येथील मासेमारी करणाऱ्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.  एमएमआरडीएनेही अनेकदा सर्वेक्षण करून स्थानिक मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार २९० मच्छीमारांना आर्थिक नुकसानीचा पहिला हप्ता देण्यात आला होता. मात्र बाधित मच्छीमारांची तयार करण्यात आलेल्या यादीपैकी ७८९ मच्छीमारांना अद्यापही आर्थिक नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी पात्र असलेल्या मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी  नुकसानपात्र ७८९ मच्छीमारांच्या यादीचे सार्वजनिकरीत्या वाचनही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बाधित मच्छीमारांना एमएमआरडीएकडून आर्थिक नुकसानीची रक्कम देण्यात टाळाटाळ केली जात आहे.

वारंवार पत्रव्यवहार, निवेदन, चर्चा, बैठकांनंतरही एमएमआरडीएकडून आर्थिक नुकसानीची रक्कम देण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. एमएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच संतप्त झालेल्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी न्हावा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ७८९ बाधित मच्छीमारांना जोपर्यंत आर्थिक नुकसानीची रक्कम दिली जात नाही तोपर्यंत १४ मार्चपासून न्हावा शिवडी सी-लिंकचे काम बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

  या पत्रकार परिषदेला न्हावा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजूषा ठाकूर, सदस्य किसन पाटील, सागर ठाकूर, प्रल्हाद पाटील, देवेंद्र भोईर, सदस्या विजया ठाकूर, निर्मला ठाकूर, कल्पना घरत, माजी सरपंच हनुमान भोईर, माजी अध्यक्ष आशीष पाटील, शाखाप्रमुख संजय ठाकूर, न्हावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राकेश पाटील, न्हावा शेकाप अध्यक्ष जयंत पाटील, समाजसेवक राम मोकल, सुजित ठाकूर, प्रकाश कडू हनुमंत आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.