scorecardresearch

मुलांसाठी आजपासून दुसरी लसमात्रा; १२ ते १४ वयोगट, पालिका रुग्णालयांसह आरोग्य केंद्रांवर सुविधा

शहरात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत ७५ टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नवी मुंबई : शहरात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत ७५ टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रांसह २०८ शाळांमध्ये यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई शहर आघाडीवर आहे. १८ वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्रचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. तर १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण सुरू झाल्यानंतर वेगवान लसीकरण केले आहे. यासाठी पालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रे व २११ शाळांमध्ये लसीकरण करीत आतापर्यंत ४७,४५९ लाभार्थीपैकी ३५,२६० मुलांना पहिला लस मात्रा देण्यात आली आहे. हे प्रमाण टक्केवारीत ७४.५९ टक्के इतके आहे. आता पालिका प्रशासनाने दुसरी मात्रा देण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. पालिकेच्या नेरुळ, ऐरोली, वाशी, तुर्भे या रुग्णांलयांसह कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटर, २३ नागरी आरोग्य केंद्रावर हे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटासाठी कोर्बेवॅक्स ही लस दिली जात असून पहिल्या लसमात्रेच्या २८ दिवसांनंतर दुसरी लसमात्रा दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरण विभागामार्फत देण्यात आली.
शहरातील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना बुधवारपासून दुसरी लसमात्रा दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमध्येही या वयोगटातील लसीकरणासाठी नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या लसमात्रेसाठी देखील २०८ शाळांमध्ये लसमात्रा दिली जाणार नाही. – डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second vaccine children today facilitieshealth centers including municipal hospital 12 14 years amy

ताज्या बातम्या