लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेलमधील जेष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी (५८) यांची हत्या त्यांच्या पत्नीने व तीच्या प्रियकराने खांदेश्वर येथील गवळी यांच्या राहत्या घरी केली. तीन दिवसांपूर्वी (शुक्रवार) गवळी यांचा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सूमारास आकस्मात मृत्यू झाला होता. विष्णू यांचे भाऊ शिवाजी यांनी शनिवारी मध्यरात्री पोलीसांना दिलेल्या तक्रारीनंतर खांदेश्वर पोलीसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. 

Calf reunited with female leopard,
VIDEO : बछड्यांचे मादी बिबटसोबत पुनर्मिलन
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Property Rights Of Illegitimate Children in India
अवैध विवाहाच्या अपत्यांचा वारसाहक्क
Mamata Banerjee fb
Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार

विष्णू गवळी हे खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ९ येथील पीएल ५ टाईपमधील सिद्धिविनायक इमारतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते. विष्णू यांची ३७ वर्षीय पत्नी अश्विनी व त्यांचा २६ वर्षीय वाहनचालक समीर ठाकरे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. याबाबत विष्णू यांना समजल्यावर त्यांनी अश्विनी व समीर यांच्या भेटीला विरोध सुरु केला. विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी आणि विष्णू यांच्या मृत्यूपश्चात अश्विनीला मिळणाऱ्या संपत्तीमुळे या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचे पोलीसांच्या तक्रारीत म्हटले आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : धरण भरलेले तरीही शहरात अनेक भागात पाणी पुरवठा नाही, पाणी वाहिनी दुरुस्ती; मात्र पूर्वसूचना नाहीच 

बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू हे ओळखले जात. तसेच अंदमान पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करीत असून ते अनेक वर्षे वीर सावकरांच्या विचारांचे प्रचारक होते. सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते स्वतःची ओळख लपवून गुप्तहेर म्हणून करत असत. त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.