नवी मुंबई : कुठल्याही रुग्णालयात रुग्णांना त्रास होईल असे कृत्य करण्यास मनाई आहे. असे असले तरीही ऐरोली येथील महानगर पालिका रुग्णालयात एका नवंजात बाळावर धार्मिक विधी करत शंख आणि घंटी वाजवून मंत्रपठण केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या वेळी रुग्णालय कर्मचारी दिसून येत असून ते कुठलीही आडकाठी करताना दिसत नाहीत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिकचा बाबा म्हणून प्रसिद्ध झालेला अशोक खरात याच्या बुवा बाजीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मोठया प्रमाणात बातम्या सुरु असून वर्तमान पत्राची रकाने त्याच्या करणाम्याने भरलेले दिसत आहेत. यात नेमके काय ते न्यायालय ठरवेल मात्र या घटनेने अंधश्रद्धा विषय ऐरणीवर आला आहे. बुवाबाजी करणाऱ्यांवर संताप व्यक्त होत असताना शिक्षित लोक अशा बुवांच्या भुलथापांना बळी कसे पडतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या व्हिडीओ व्हायरलं होत आहे. हा अंधश्रद्धा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक महिला एका नवंजात बाळाला दुपट्यात गुंडाळून आयसीयूचा दरवाजा उघडून बाहेर येते. बाहेर एक दाढीधारी व्यक्तीं मंत्र पुटपुटतो. नंतर बाळाला नमस्कार करून एक उलटी एक सुलटी फेरी स्वतःभोवती मारतो. एवढ्यावर हे थांबत नाही तर घंटी वाजवली जाते. आणि जोरात शंख वाजवला जातो. त्या नंतर ते बाबा बाळाला ज्या महिलेने कुशीत घेतले तिच्या समोर साष्टांग नमस्कार घालताना दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रुग्णालय कर्मचारी यावेळी उपस्थित असल्याचे दिसून येते. जेव्हा ते बाबत जोरात शंख नाद करतात त्यावेळेस अजून काही कर्मचारी येथे पोहचतात. मात्र या प्रकाराला कोणीच अडवताना प्रतिबंद करताना दिसत नाही. याबाबत आरोग्य विभागाने नेमके काय आहे हे पाहून कारवाई केली जाईल असे सांगितले. तर आरोग्य विभाग सभापती जयाजी नाथ यांना याबाबत छेडले असता त्यांनी असा प्रकार समजला आहे. असे सांगितले तसेच महानगर पालिका रुग्णालयातील असा व्हिडीओ माझ्याही पाहण्यात आला आहे. याबाबत चौकशी आदेश देण्यात आले आहे. चौकशी केल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे नाथ यांनी सांगितले
