नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात दोन सीबीएसई शाळा सुरू केल्या आहेत. दिवसेंदिवस या महापालिकेच्या सीबीएसई शाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. परंतु कोपरखैरणे येथील शाळेत १२५० विद्यार्थ्यांची मदत मदार अवघ्या दहा शिक्षकांवर आहे. जून- जुलैपासून विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत . मात्र, आता परीक्षा तोंडावर आली असून तरीदेखील या शाळेला शिक्षक मिळेनात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचा- निश्चय केला…नंबर पहिला…; देशात स्वच्छ सर्वेक्षणात कितवा नंबर पटकावणार याची नवी मुंबईकरांना उत्सुकता

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई बोर्डाचे शाळा सुरू केली आहे. नेरुळ आणि कोपरखैरणे येथे शाळा सुरू करण्यात आलेली आहे. नेरुळ येथील शाळा महापालिका आणि संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी १२०० विद्यार्थ्यांसाठी ३६ शिक्षक आहेत . मात्र दुसरीकडे कोपरखैरणे येथील शाळेत १२५० विद्यार्थ्यांसाठी अवघे १० शिक्षक आहेत. येत्या १० ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांची परीक्षा होणे अपेक्षित आहे. मात्र परीक्षा तोंडावर आली असून आत्तापर्यंत अवघे २० ते २५ टक्केच अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. अद्याप २०% अभ्यासक्रम घेणे बाकी आहे. जिथे ६ तासांची शाळा भरते तेच या ठिकाणी अवघी ३ तासांची शाळा असते . या तीन तासात शिक्षक विद्यार्थ्यांना काय काय आणि कोणत्या पद्धतीने शिकवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील शिक्षकांनाही परीक्षा जवळ आली असून अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा ? असा प्रश्न पडला आहे . कोपरखैरणे येथील शाळेत एकूण १२५० विद्यार्थी त्यापैकी प्राथमिक मध्ये १७ तुकडीत ६६६ विद्यार्थी संख्या असून यासाठी केवळ ५ शिक्षक आहेत. तर नर्सरीकरिता ४ शिक्षक असून १६ तुकडीमध्ये ५७६ पटसंख्या आहे आणि १ मुख्याध्यापक असे १० शिक्षक आहेत. जून-जुलै पासून शिक्षक मिळतील या आशेवर विद्यार्थी आणि पालक आहेत , मात्र अद्याप पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- प्रशासनात मोठा खांदेपालट; ठाणे आयुक्तपदी अभिजीत बांगर, नवी मुंबई आयुक्तपदी नार्वेकर

शिक्षक भरतीला प्रतिसाद नाही

शिक्षक भरतीसाठी संस्थेच्या माध्यमातून निविदा काढली होती. दोनवेळा संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांबाबत विचारणा करण्यात आली,मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यासाठी महापालिका दुसरा पर्याय शोधत आहे. दुसऱ्या पर्यायातून शिक्षक भरती करता येईल याबाबत चाचणीपाणी सुरू आहे. अशी माहिती महापालिका तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

शिक्षक पुरेसे नाहीत , शिक्षकांना कमी वेळात जास्त विद्यार्थ्यांना हाताळणे आवाक्याबाहेर जात आहे. जिथे ६ तासांची शाळा असते, इथे फक्त ३ तास असून १० शिक्षक २ ते ३तासात मुलांना काय काय शिकणवणार ? मुलांची प्रगती होत नाही. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत पुरेसे शिक्षक असणे अनिवार्य आहे, असे मत पालक रेणुका म्हात्रे यांनी व्यक्त केले.