नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबईतून जाणाऱ्या शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सहा महिन्यांपूर्वी ती पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र तरीही अनेक ठिकाणी अंधार कायम असल्याने वाहनचालकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात या कामांना मंजुरी मिळेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शीव पनवेल महामार्ग हा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने येथील स्वच्छता सर्वेक्षण, दिवाबत्ती इत्यादी आवश्यक सुधारणांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत होते. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी याचे खापर नवी मुंबई महापालिकेवर फोडत होते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील महामार्गावरील दिवाबत्तीदेखभाल दुरुस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. मात्र अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे महामार्गावरील दिवाबत्तीचा प्रश्न आणखी गंभीर झाला होता.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार

जानेवारी महिन्यात हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेला यापोटी ८ कोटी २९ लाख रुपये निधीही देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा महामार्ग एलईडी दिव्यांनी उजाळणार, अशी घोषणा महापालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात येत आहेत. मात्र याला सहा महिने झाले तरी या महामार्गावरील दिवाबत्तीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात पालिका प्रशासनाला विचारणा केली असता आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिवाबत्तीची कामे केली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दिवाबत्तीसह भुयारी मार्ग हस्तांतरित

वाशी टोलनाका ते कोकण भवनपर्यंत महामार्गावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विद्युत यंत्रणा व मीटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चार पादचारी भुयारी मार्गही देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.

शीव पनवेल महामार्गावरील प्रस्तावित दिवाबत्ती करण्यासाठी संबंधित महामार्ग हस्तांतरित झाला आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू करण्यात येणार आहे.

शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता विद्युत , महानगरपालिका