सेक्टर ४२ मधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला. स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळीने २३ किलो सोने व ९ लाख रुपये असा ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला.

दरोडखोरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी  कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून रेकॉर्डिगची सीडीआर मशीनही लुटली. ही टोळी तोंडाला मास्क व रुमाल बांधून  कंपनीत घुसली होती. कंपनीत शिरताच या टोळीने सुरुवातीलाच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून सीडीआर मशीन काढून घेतले. त्यानंतर फायनान्स कंपनीतील कर्मचांऱ्याना चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून २३ किलो वजनाचे सोने व ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पलायन केले. याबाबत  माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. या लुटारूंच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबईत नाकांबदी केली असून शहरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.