नवी मुंबई : साखरेच्या गोणी पडल्या महागात; आरोपीस ६ महिने कारावास आणि दहा हजाराचा दंड|six months imprisonment fine of 10,000 to the accused for stealing the debt of a sugar merchant | Loksatta

नवी मुंबई: साखरेच्या गोणी पडल्या महागात; आरोपीस ६ महिने कारावास आणि दहा हजाराचा दंड

या बाबत ६ जानेवारी २०१८ ला एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नवी मुंबई: साखरेच्या गोणी पडल्या महागात; आरोपीस ६ महिने कारावास आणि दहा हजाराचा दंड
(प्रातिनिधिक छायाचित्र)

एका साखर व्यापाऱ्याचे देयक चोरी करून परस्पर स्वतःच माल उचलणाऱ्याला अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. या फसवणूकी संदर्भात २०१८ मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला असून आरोपीस सहा महिने सश्रम कारावास आणि १० हजाराचा दंड ठोठावला आहे.

दत्तात्रय सपाटे असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंधेरी येथील चेतना ऑईल सेंटरने चार गोणी साखरेची मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील मसाला मार्केट मधील सुर्या ट्रेडर्स कडे नोंदवली होती आणि त्याचे पैसेही दिले होते. हे पैसे दिलेले देयक सपाटेने चोरी केले व आपण चेतना ऑईल सेंटर मधून आल्याचे भासवत सुर्या ट्रेडर्स हे देयक दाखवले. त्यांनीही देयक असल्याने चार गोणी साखर दिली. अनेक दिवस होऊनही साखर न पोहचल्याने फिर्यादीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: उरण : दलाला पासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

या बाबत ६ जानेवारी २०१८ ला एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस तपासात सपाटे याला अटक करण्यात आली होती. या बाबत मंगळवारी निकाल देण्यात आला . त्यानुसार सपाटे याने देयक चोरी करून फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. सरकारी वकील म्हणून अरुण फाटके यांनी काम पाहिले तर कोर्ट अंमलदार म्हणून मोकल व राठोड यांनी काम पहिले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:05 IST
Next Story
उरण : दलाला पासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन