पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सहा दिवसांपूर्वी प्रियांका रावत या प्रवासी महिलेच्या खूनाप्रकरणी पोलीसांनी पती व त्याच्या प्रियसीसह अजून चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पती व त्याच्या प्रियसीने फेसबूकवरुन माहिती घेऊन त्यांची ओळख काढून कंत्राटी मारेक-यांना पाच लाख रुपयांची सुपारी देऊ केली होती. सूपारीचे पाच लाख रुपयांपैकी सव्वा लाख रुपये बॅंकेच्या आरटीजीएसने मारेक-यांना दिल्याचा पुरावा पोलीसांच्या हाती लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. या प्रकरणात प्रियांका हीचा ३१ वर्षीय पती देवव्रत रावत हा अमेझॉन कंपनीत कामाला होता. याचदरम्यान २३ वर्षीय निकिता मतकर यांची आेळख झाली. त्यांचे काही महिन्यात प्रेम झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत

नूकतेच देवव्रत आणि निकीता यांनी एका मंदीरात विवाह केला होता. प्रियांका हीला या विवाहबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या संसारात भांडणे सूरु झाली. देवव्रत आणि निकिता यांनी रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर प्रियंका हीला संपविण्याचा निर्णय घेतला. निकिता ही खासगी शिकवणी वर्ग घेत होती. या शिकवणीवर्गाचा मालक प्रविण घाडगे हा होता. प्रविण , प्रियांका आणि देवव्रत यांनी तीघांनी एकत्रितपणे पैशांची जुळवाजुळव करुन मारेकरी फेसबुकवर बुलढाणा जिल्ह्यातील शोधले. वाहन चालक असणारा रोहीत उर्फ रावत उर्फ शिव राजू सोनोने, बाजारात माल विक्री करणारा पंकज नरेंद्रकुमार यादव तर दूध विक्री करणारा दीपक दिनकर लोखंडे या २२ ते २६ वर्षे वयोगटातील संशयी आरोपींना खूनाची सुपारी दिली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : तुर्भे वाहतूक पोलीस भोगताहेत नरकयातना

या तीघांवर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे बुलढाण्याच्या मलकापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूभाष कोकाटे, पोलीस निरिक्षक वैशाली गलांडे, पोलीस अधिकारी समीर चासकर, शरद बरकडे, शांतीभुषण कामत, किरण वाघ, पोलीस कर्मचारी महेश कांबळे, सुदर्शन सारंग, प्रकाश पाटील, वैभव शिंदे,धिरेन पाटील व इतर कर्मचा-यांनी अथक मेहनत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six people arrested in priyanka rawat murder case amy
First published on: 21-09-2022 at 17:28 IST