पाच लाख लाभार्थी दुसऱ्या मात्रेविना

नवी मुंबईत १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या ही ११ लाख ७ हजार इतकी गृहीत धरली होती.

नवी मुंबई : मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात नवी मुंबईत सर्वप्रथम पहिल्या मात्रेचे लसीकरण करण्यात यश आले असले तरी दुसरी मात्रा घेण्यासाठी असलेला निरुत्साह पाहता संपूर्ण लसीकरणासाठी पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत फक्त ४ लाख ८६ हजारांपेक्षा अधिक जणांनीच दुसरी मात्रा घेतली असून हे प्रमाण ५० टक्केच्या घरातच आहे.

नवी मुंबईत १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या ही ११ लाख ७ हजार इतकी गृहीत धरली होती. त्यानुसार शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरही शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण होत आहे. यावरून एकूण लसपात्र नागरिकांची संख्या आणखी वाढणार आहे.

पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या मात्रेचे लसीकरण संथ गतीने सुरू आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून लसीकरणास प्रतिसाद कमी मिळत आहे. पहिल्यांदाच पालिकेकडे लस पडून आहे, मात्र लस घेण्यासाठी लाभार्थी येत नसल्याचे चित्र असल्याने प्रशासनापुढे चिंता आहे. त्यामुळे पहिली मात्रा घेतल्यानंतर कालावधी पूर्ण झाल्यानंतरही लस घेण्यास न आलेल्यांना पालिका संपर्क करीत आहे.

 पालिका दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांना लस देण्यासाठी तयार आहे; परंतु नागरिक टाळाटाळ करत असल्याचे चित्र असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी दोन्ही लसमात्रा घेणे आवश्यक आहे. करोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी दोन्ही लसमात्रा घेण्याचे आवाहन पालिकेच्या लसीकरणप्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी केले आहे.

लसीकरण

पहिली मात्रा : ११,२६,९६२

दुसरी मात्रा :  ६,२०,८६९

शिल्लक  लसमात्रा

कोविशिल्ड :  ६६,४२०

कोव्हॅॅक्सिन :  ११,२३५

एकूण शिल्लक  : ७७,६५५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: So far only 4 lakh 86 thousand people taken vaccine second dose zws

Next Story
सिडकोकडून भूमिपुत्रांवर अन्याय
ताज्या बातम्या