Son-in-law along with his friend arrested for killing a person who had an immoral relationship with his mother-in-law in navi mumbai | Loksatta

सासूशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीची जावयाकडून हत्या; पोलिसांकडून दोघांना अटक

सासूचे अनैतिक संबंध पटत नसल्यामुळे जावयाकडून सासूच्या प्रियकराची हत्या

सासूशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीची जावयाकडून हत्या; पोलिसांकडून दोघांना अटक
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबईतील तुर्भे येथे झालेल्या हत्येचे गूढ उलगडले असून ही हत्या अनैतिक सबंधातून झाली असल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे आणि एका महिलेचे अनैतिक सबंध होते. हे संबंध न पटल्याने महिलेच्या जावयाने मित्राच्या सहाय्याने सासूच्या प्रियकराची ही हत्या केली असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. पोलिसांनी आऱोपी जावई आणि त्याच्या मित्राला अटक केली असून न्यायालयाने त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- ‘सोयाबीन आणि कापसाला भाव द्या’; मंत्रालयासमोर जलसमाधी घेण्यासाठी निघालेले शेतकरी पनवेलमध्ये नजरकैदेत

मोनू राजकुमार दिक्षीत आणि  हेंमेंद्र फेकु गुप्ता, असे अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मोलमजुरी करून गुजराण करतात. २२ तारखेला सकाळी साडे आठच्या सुमारास तुर्भे पोलीस ठाणे हददीत ब्रिजखाली चाळीशीतील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासात फरशी व विटांनी व्यक्तीच्या डोक्यावर घाव घालून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु करण्यात आला. खबरीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. चौकशीअंती आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मयत इसमाचे मोनू याच्या सासूबरोबर अनैतिक संबंध होते. हाच राग मनात धरून मोनू आणि त्याच्या मित्राने हाताने व नंतर फरशी व विटांच्या सहाय्याने डोक्यावर वार करुन संबंधित व्यक्तीची हत्या केली होती. हत्येनंतर दोघांनी तिथून पळ काढला. या प्रकरणातील मयत व्यक्तीचे निश्चित नाव समोर आले नसून तो बंगाल येथील रहिवासी आहे एवढीच माहिती मिळाली आहे.
 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 17:46 IST
Next Story
नवी मुंबई: एपीएमसीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली, गोडवा मात्र कमीच