नवी मुंबई –  नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमधील मानांकनात येथील स्वच्छताकर्मींचा सर्वाधिक महत्वाचा वाटा असून त्यामध्ये स्वच्छताकर्मी महिलांचीही महत्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त करीत त्यांच्या कार्याचा बहुमान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी यामुळे हिरकणी असणाऱ्या आमच्या महिला स्वच्छताकर्मींना अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा >>> नितीन गडकरी म्हणतात “मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याचे दुःख”; सांगितली नवी डेडलाईन

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने हिरकणी फाऊंडेशन व लेक माहेरचा कट्टा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भवन, सीबीडी बेलापूर येथे आयोजित नवी मुंबईची हिरकणी या स्वच्छतादुतांच्या विशेष सन्मान कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  हेमांगिनी पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी  ज्योती देशमुख, राज्यकर आयुक्त विभागाच्या अधिकारी  स्वाती थोरात, वन विभागाच्या अधिकारी  सपना बिरारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक  विशाल माने आणि इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३२ महिला स्वच्छताकर्मींना मानाची साडी, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक विजय नाईक यांनीह उपस्थितांना स्वच्छतेविषयी माहिती देत सामुहिकरित्या स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या २४सेवाभावी संस्थांनाही गौरविण्यात आले.‘गौरव तुमचा, आनंद आमचा’ असे म्हणत हिरकणी फाऊंडेशनच्या अध्यक्ष  जयश्री शेलार व लेक माहेरचा कट्टा ग्रुप संस्थेच्या प्रमुख  सारिका डहाणे आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी अत्यंत उत्साहने या समारंभाचे आयोजन केले होते.

हेही वाचा >>> स्वच्छोत्सव-२०२३ कार्यशाळेमध्ये नवी मुंबईतील विशेष स्वच्छता उपक्रमांची नवी दिल्लीत प्रशंसा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छतेबाबत पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा  लावून महिला स्वच्छताकर्मी महिला तितकेच कौतुकास्पद काम करत आहेत त्यामुळे या महिलांना दिलेला हिरकणी पुरस्कार हा आणखी जोमाने काम करण्याची उर्मी देईल. सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महापालिका