Special squad action against rickshaw drivers who refuse fare in navi mumbai ssb 93 | Loksatta

नवी मुंबई : भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर विशेष पथकाची कारवाई

नवी मुंबईतील सी उड परिसरातील अनेक रिक्षा चालकांविरोधात तोंडी, लेखी अनेक तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने याची दखल घेत एका विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

rickshaw drivers navi mumbai
मुजोर रिक्षा चालकांवर विशेष पथकाची कारवाई (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

एकीकडे रिक्षा खूप झाल्याने धंदा होत नसल्याची ओरड रिक्षा चालक करतात तर दुसरीकडे जवळचे वा इच्छा नाही म्हणून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. नवी मुंबईतील सी उड परिसरातील अनेक रिक्षा चालकांविरोधात तोंडी, लेखी अनेक तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने याची दखल घेत एका विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षा चालकांविषयी तसेच बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तक्रार आल्याने पाहणी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने
वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक शाखेतील स्ट्रायकिंगवरील अंमलदार व सिवूड वाहतूक शाखा येथील अधिकारी व अमंलदार यांचे सह सिवूड वाहतूक शाखा हद्दीत कारवाई केली गेली.

हेही वाचा – येत्या मंगळवारपासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

हेही वाचा – उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग

स्थानिक नागरीक रिक्षा चालक हे भाडे नाकारतात, उद्धट वर्तन करतात. मिटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. तसेच बाईक, कार, रिक्षा, व इतर वाहने यांची पार्किंग, होणारी वाहतूक कोंडी याबाबत लेखी व तोंडी तक्रारीमुळे सिवूड मॉलसमोरील रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या एकूण १४४ वाहनांवर मो. वा. का. कलम १२२ अन्वये १ लाख ७ हजार इतक्या दंडाच्या रक्कमेची संयुक्तीक कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई चालकामध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली असून, यापुढेही वाहन धारकांनी आपली वाहने ही नियोजित केलेल्या पार्कीगमध्ये पार्क करावी. तसेच, कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ही करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:11 IST
Next Story
उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग