नवी मुंबई : रस्त्यावर होणारे सर्वाधिक अपघात हे भरधाव वाहनांमुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता व्यवसायिक वाहनांना वेग नियंत्रक स्पीड लॉक डिव्हाईस बंधनकारक केले आहे. त्यानुसार वाहनांमध्ये असे वेग नियंत्रक असतील तरच त्या वाहनांची पासिंग केली जाईल, अशी माहिती वाशी आरटीओने दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार

हेही वाचा – उरण – पनवेल मार्गावरील हाईट गेटमुळे अपघातात वाढ; प्रवाशांच्या जिवाला धोका

मागील काही महिन्यांपासून वाहतूक नियमांत मोठे बदल होत आहेत. दरम्यान नुकतेच नवीन कारमध्ये सहा एअर बॅग बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच मागील आसनावर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. अतिवेगाने वाहन चालविल्याने रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी वेग नियंत्रक अर्थात स्पीड लॉक डिव्हाईस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र शासनाने २०१८ साली घेतलेला होता. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने आता स्पीड गव्हर्नरबाबत अंमलबजावणी सुरू केली असून, प्रथमतः व्यवसायिक वाहनांना वेग नियंत्रक बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड लॉक डिव्हाईस) नाही, अशा वाहनांची पासिंग होणार नाही, अशी माहिती वाशी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.