नवी मुंबई : आशियाई फेडरेशन ऑफ कॉन्फेडरेशन आयोजित ‘एएफसी’ महिला आशियाई फुटबॉल चषक २०२२ स्पर्धेचे यजमानपद मुंबई, पुण्यासह नवी मुंबई शहर भूषवीत आहे. क्रीडानगरी म्हणूनही नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईत या माध्यमातून जगभरातील नामांकित महिला फुटबॉलपटू येणार असून त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबई सज्ज आहे. यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला असून या माध्यमातून फुटबॉल खेळाचा व्यापक प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे.

शहरात विविध चौक, मोक्याची ठिकाणे येथे भित्तीचित्रे, शिल्पाकृती याव्दारे फुटबॉल खेळाची वातावरण निर्मिती  करण्यात आली असून मोठय़ा फलकांद्वारे व्यापक प्रचारही सुरू आहे. त्याचप्रमाणे नेरुळ सेक्टर १९ येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात निर्मिलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदानही सराव सामन्यांसाठी सज्ज करण्यात आलेले आहे. या लोकप्रिय खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता एएफसी महिला आशियाई फुटबॉल स्पर्धेविषयीची सचित्र माहिती देणारा अभिनव चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे.  या चित्ररथाचा आशियाई फेडरेशन ऑफ कन्फेडरेशनच्या (एएफसी) प्रकल्प संचालक  नंदिनी अरोरा यांच्या हस्ते  शुभारंभ करण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे, क्रीडा विभागाचे उपायुक्त  मनोज महाले, क्रीडा अधिकारी  अभिलाषा म्हात्रे व क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. 

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वापरात नसलेल्या एनएमएमटी बसचे रूपांतर चित्ररथात करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या आशिया खंडातील विविध देशांच्या महिला फुटबॉल खेळाडूंची छायाचित्रासह माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.  याशिवाय या स्पर्धेविषयीची संपूर्ण माहिती तसेच यावर्षीच्या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई तसेच पुण्यात होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारे चित्र , माहिती फलक तसेच फिफा स्पर्धेचीही माहिती देण्यात आलेली आहे. अत्यंत आकर्षक स्वरूपात सजवलेल्या या चित्ररथाच्या दोन्ही दर्शनी बाजूवर महिला फुटबॉलपटूंचे छायाचित्र तसेच इतर माहिती देण्यात आलेली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेशही प्रसारित करण्यात येत आहे.

जिंगल्स आणि ध्वनिचित्रफिती

जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी आणि नामवंत कलाकार अमोल ठाकूरदास यांच्या कला दिग्दर्शनाखाली एनएमएमटीच्या वापरात नसलेल्या बसचे  आकर्षक स्वरूपातील चित्ररथात रूपांतर करण्यात आले आहे. जिंगल्स तसेच ध्वनिचित्रफितीही प्रदर्शित केल्या जात आहेत. अमोल ठाकूरदास यांनी शब्दबध्द केलेल्या या मराठी आणि हिंदूी गाण्यांना प्रसिध्द संगीतकार प्रणय प्रधान यांनी संगीत दिले आहे. गायिका शिबानी दास आणि प्रणय प्रधान यांनी ही जिंगल्स गायलेली आहेत. ६ फेब्रुवारीपर्यंत या चित्ररथाव्दारे स्पर्धेचा व त्या माध्यमातून फुटबॉल खेळाचा व्यापक प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे.