राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सकाळी लवकर उठायची सवय आहे. राज्यातले शिंदे सरकार फार काळ टिकाणार नाही अशी ग्वाही देणाऱ्या अजिदादांनी हे लक्षात ठेवावे की तुम्हाला लवकर उठायची सवय आहे. शिंदे सरकार पडणार नाही ते आपला कार्यकाळ पूर्ण करणारच असून आमच संख्याबळ कमी होणार नाही उलट आमचे संख्याबळ १९० झाले हे तुम्हालाच कळणार नाही तेव्हा सकाळी तुम्हाला व तुमच्या पक्षालाच धक्का बसेल असा टोला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नवी मुंबई येथे लगावला.

हेही वाचा >>>नवी मुंबई : करोनाकाळाच्या दोन वर्षात कोकण रेल्वे महामंडळाला १३५ कोटींचा तोटा

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
vinod patil s meeting with chief minister deputy chie
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी विनोद पाटील यांची चर्चा; छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली

नवी मुंबईत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पाटण विधानसभा मतदारसंघ व मुंबई रहिवाशी मित्र मंडळाच्यावतीने नागरी सत्काराच्याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना आव्हान दिले.विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही युती म्हणून लढलो.परंतू निवडणूका झाल्यानंतर अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री मुद्दा अचानक बाहेर काढला याबाबत आम्हाला कधीच माहिती नव्हते. मोदींनी सभेत सांगीतले होते की पुढचा मुख्यमंत्री फडणवीस होणार तेव्हा उध्दव ठाकरे सभेला होते.परंतू निवडणुका झाल्यानंतर अचानक मुद्दा उपस्थित झाला. ज्यांच्या विरोधात मते मागीतली त्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी आम्हाला तेव्हाही मान्य नव्हती तेव्हाही विरोध केला परंतू आमचे कोणी ऐकले नाही.माझा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असे सांगीतले व महाविकास आघाडी करुन तेच मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री शिवसेनेचा पण त सरकार कोण चालवतय तर राष्ट्रवादीचे अजितदादा असे चित्र होते. आमच्या मतदारसंघात आम्ही आमदार पण निधी मात्र राष्ट्रवादीला अशी स्थिती होती. सातत्याने ठाकरे यांच्याकडे याबाबत दुखणे सांगीतले पण तीन पक्षाच सरकार चालवायचय जरा थांबा असे सांगायचे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेल सरकारच आम्ही चालवतोय. कोणी खोके म्हणतात कोणी कोणी गद्दार म्हणतात परंतू जे तुम्हाला एवढ्या वर्षात जमले नाही ते शिंदे सरकारने विकासात्मक कामे व निर्णय काही दिवसात करुन दाखवली.त्यामुळे शिंदे सरकार स्थिर असून विकासात्मक कामे अधिक वेगाने करुन दाखवणार असल्याचा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला शिंदे गटाचे नवी मुंबईतील नेते व समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा >>>एलिफंटा होणार ‘पाणीदार’; बेटावरील ग्रामस्थ आणि पर्यटकांची पुढील ४० वर्षांची पाण्याची चिंता मिटणार

अजितदादा…. एक दिवस पहाटे तुम्हालाच धक्का बसेल……
आमचे सरकार फार काळ टिकणार नाही. लवकरच पडणार.या सरकारमध्ये धुसफूस आहे असे सांगणाऱ्या व लवकर उठणाऱ्या अजित पवार यांना आमचे संख्याबळ १९० कधी होणार हे तुम्हालाच कळणार नाही.त्यामुळे तुम्ही तुमचे आमदार सांभाळा.एक दिवस पहाटे तुम्हालाच धक्का बसेल. – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क व ठाणे जिल्हा पालकमंत्री