प्लास्टिकमु्‌क्त नवी मुंबई शहर हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी शहरातील आठ ही विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नागरिकांना लागावी यादृष्टीने मार्केट्समध्ये कापडी पिशव्यांचे विनामुल्य वाटप असे उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांवरील धडक कारवाई करीत तुर्भेतून २ टन ३० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला आहे. तसेच ५० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. १० दिवसांपूर्वीच तुर्भे विभागातूनच १ टन २०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याच विभागात ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

हेही वाचा: नवी मुंबई : अवजड वाहतूक डोकेदुखी ठरत असल्याने पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

या कारवाईमध्ये तुर्भे येथील मसाला मार्केट मधील विधी प्लास्टिकचे गोडाऊन, ग्रोमा सेंटरमधील गाला ब्रदर्स, जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यावसायिकांवर दुसऱ्यांदा प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा दाखल झाल्याने प्रत्येकी १० हजार रु इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त करण्यात आला व त्यांस समज देण्यात आली.

हेही वाचा: उरण : मोरा-मुंबई जलसेवा आज चार तास बंद राहणार

तुर्भे येथील मर्चंट सेंटर मधील न्यू मार्ट आणि ओम फरसाण मार्ट या दोन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्याने पहिला गुन्हा म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक ५ हजार रु इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. याप्रमाणेच २१ डिसेंबरला सेक्टर १९ तुर्भे येथील थर्माकोल गोडाऊनवर अचानक छापा टाकत २३९ बॉक्स जप्त करीत त्यात असलेले साधारणत: ३५० किलो वजनाचे थर्माकोल जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून १० हजार रु इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली.