एपीएमसी बाजारात ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. मात्र यंदा पाऊस लांबला असून अवकाळी पडलेल्या पावसामुळे  पाचगणी आणि महाबळेश्वर मध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची  लागवड करण्यात आलेली आहे.  तर काही ठिकाणी पावसामुळे लागवड झाली नाही.  लागवड केलेल्या रोपट्यांना पावसाचा फटका बसला आहे तर लागवड केली नसल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे मत व्यापारी आणि  स्ट्रॉबेरी शेतकरी बागायतदार यांच्याकडून होत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: निर्बंधमुक्त दिवाळीचा कचरा रस्त्यावर; रात्री उशीरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी

state of india s environment 2024 climate warnings amidst record high temperatures
अन्वयार्थ : हवामानकोपाला सामोरे कसे जाणार?
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर  नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून  ऑक्टोबर अखेर- नोव्हेंबर  महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात सध्या तुरळक आवक होत असून ५०बॉक्स दाखल होत आहेत. 

पाव किलोला ३००- ते ४००रुपये बाजारभाव आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने उशिरा लागवड झाली आहे. आधी लागवड केलेल्या पिकांच नुकसान झाले आहे. साधारणतः स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन निघण्यासाठी दोन ते अडीच महिने कालावधी लागतो. त्यामुळे अद्याप लागवड न झालेल्या उत्पादनाला जानेवारी महिना उजाडेल तर लागवड झालेले उत्पादन डिसेंबर मध्ये बाजारात दाखल होईल, अशी माहिती स्ट्रॉबेरी बागायतदार तृप्ती बावळेकर यांनी दिली आहे.