नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने १२ ते १४ वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून मार्च अखेपर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. या वयोगटातील ४७,४५९ लाभार्थी असून आतापर्यंत दहा हजार मुलांना लस देण्यात आली आहे.

१६ मार्चपासून या वयोगटातील लसीकरणाला शहरात सुरुवात झाली. सुरुवातीला पालिका प्रशासनाने पालिकेच्या चार रुग्णालयांत लसीकरणाचे नियोजन केले होते. त्यामुळे सोमवापर्यंत १८९१ मुलांना लसमात्रा देण्यात आली होती. मात्र मंगळवारपासून शहरात लसीकरण केंद्रे वाढवण्यात आली असून शाळांमध्येही लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात ६५८६ मुलांना लस देण्यात आली. त्यामुळे लसीकरणाला वेग आला असून बुधवापर्यंत १४,९६७ मुलांना लस देण्यात आली आहे. शहरात या वयोगटातील ४७,४५९ लाभार्थी असल्याचे शासनाने आता जाहीर केले असून या सर्व लाभार्थ्यांना या महिनाअखेपर्यंत १०० टक्के लस देण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के
More than 25 thousand schools without principal Demand for annulment of government decision on revised criteria of accreditation
२५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

पालिकेने शहरातील नेरुळ, ऐरोली, वाशी, तुर्भे, तसेच कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो केंद्राबरोबर शहरातील २११ शाळांमध्ये १२ ते १४ वयोगटांतील लसीकरम्णाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुढील १० दिवसांत  मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्याचे नियोजन आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी पालिकेला आतापर्यंत  ५० हजार कोर्बेवॅक्स लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत.

शाळांमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये या वयोगटातील लसीकरणाचे प्रमाण कमी झाले आहे. मुले आपल्या शाळेतच जाऊन लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. दिवसाला ८ हजारांपेक्षा अधिक लसमात्रा देण्यात येत आहेत.

१२ ते २४ वयोगटांतील विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स  लसमात्रा दिली जात आहे. यात ४७,४५९ लसपात्र विद्यार्थी असून पुढील १० दिवसांत या गटातील लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडे ५०,८०५ लसमात्रांचे नियोजन केले आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त