येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय महालण विभाग फुंडे मधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी उरणचा पिरवाडी समुद्र किनारा स्वच्छ केला. महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ आमोद ठक्कर एनसीसी प्रमुख  संतोष देसाई  व प्रा पंकज भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिशास्त्र विभागातील व  एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी मिळून ही मोहीम राबवली. आज घन कचरा हा पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर गाव स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते परंतु समुद्र व त्याच्या किनार्‍यावर साठलेला कचरा समुद्रातील जीव सृष्टी साठी मोठी समस्या बनली आहे मच्छी व्यवसाया वर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यासाठी समाजा मध्ये जागृती निर्माण व्हावी व समुद्र किनारा स्वच्छ व्हावा म्हणुन कांदळवन कक्ष अलिबाग ह्यांनी वन्य प्राणी सप्ताह निमित्ताने समुद्र किनारा स्वच्छता व कांदळवन जनजागृती मोहीम राबविण्याचा उपक्रम अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते ह्यावेळेस कांदळवन कक्ष अलिबाग चे अनिकेत पेंनुरकर स्वाती सुनील महाडिक फॉरेस्टर कांदळवन आणि त्यांचा कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात होता  व त्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन जनजागृती जैव विविधता ह्या बाबत सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी समुद्र किनारी जैव सृष्टी प्रत्यक्षात पाहणी केली  व स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of veer wajekar arts science and commerce college clean pirwadi beach in uran zws
First published on: 06-10-2022 at 17:42 IST