Suicide of married women in belapur navi mumbai ssb 93 | Loksatta

नवी मुंबई : प्रेम विवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पीडित विवाहितेचा पती, सासू, सासरे यांच्याविरोधात छळवणूक आणि आत्महत्येस कारण म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Suicide
केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरची आत्महत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईतील बेलापूर येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती, सासू, सासरे यांच्याविरोधात छळवणूक आणि आत्महत्येस कारण म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हरी वाढवे हे आपल्या कुटुंबासह बेलापूर येथील पंचशील नगर येथे राहतात. त्यांनी गावाकडील कपील राऊत याला आसरा देत नौकरीस लाऊन दिले. दरम्यान त्याचे घरी येणे जाणे वाढले आणि त्यात हरी यांची मुलगी अंजली आणि कपील यांची मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. याची माहिती मिळताच कुठलीही आडकाठी न घेता दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ३ जून २०२२ मध्ये साखरपुडा आणि ५ जूनला लग्न लाऊन दिले. मुलगी सुखात राहावी म्हणून कपिल याच्या वडिलांनी मागणी केल्याप्रमाणे ५ लाख रुपये लग्नासाठी दिले.

हेही वाचा – नवी मुंबई महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम मोहीम, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्य निर्माण करणार

लग्न बौद्ध विहार भीमनगर कळमनुरी जिल्हा हिंगोली या मूळ गावी पार पडले. त्यातही अचानक केलेली ५० हजार रुपयांची मागणीही उसनवारी करून पूर्ण करण्यात आली. मात्र, लग्न झाल्यावर २० दिवसांनी मुलगी माहेरी आल्यावर सासरचे चांगले नसून पूर्ण पैसे दिले नाही म्हणून टोमणे मारतात ही तक्रार आली. कालांतराने हा त्रास वाढला. सासर माहेरजवळ असल्याने अंजलीचे माहेरी येणे जाणे होत होते, त्यामुळेही घरात वाद होत होते. दरम्यान हळू हळू ठीक होईल म्हणून समजूत काढली जात होती. मात्र, डिसेंबरमध्ये अंजली माहेरी आली ती कायमचीच. तिच्याकडील दागिने काढून घेत हाकलून दिल्याची माहितीही अंजली हिने दिली. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती.

हेही वाचा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार

३० जानेवारीला नेहमीचे काम संपवून हरी हे घरी आले त्यावेळी घराला आतून कडी होती, मात्र अनेकदा हाक मारून दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्याकडून हातोडी घेत दरवाजा तोडला व आत प्रवेश केला असता अंजलीने फाशी घेत आत्महत्या केल्याचे दृश्य दिसले. तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत ५ जून २०२२ ते १ डिसेंबर २०२२ दरम्यान हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने मुलीचा जाच करून शिवीगाळ करीत शारीरिक मानसिक त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात पती कपील राऊत सासू सिंधुताई आणि सासरा प्रल्हाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:14 IST
Next Story
नवी मुंबई महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम मोहीम, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्य निर्माण करणार